कधी लागणार निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून यावर्षी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले होते. तर यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली तर 19 ट्रान्सजेंडर होते. विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता लागली होती.
advertisement
कुठे पाहणार दहावीचा निकाल?
दहावीच्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वरून निकाल पाहावा. विद्यार्थ्यांना निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती उपलब्ध होईल.
कसा पाहावा दहावीचा निकाल?
1) निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) त्यानंतर SSC Result या लिंकवर क्लिक करा.
3) त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव भरावे लागेल.
4) यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे.
5) सबमिट करताच विद्यार्थ्यांना आपला निकाल दिसून येतो.
6) या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता तसेच डाऊनलोड सुद्धा करु शकता.