ही आंत्रप्रेन्युअर म्हणाली की टेक्नॉलॉजी क्षेत्रातील चांगल्या करिअरपासून दूर जाण्याचा निर्णय फक्त योगायोग आहे. बिझनेस इनसायडरला तिने सांगितले की ती दुपारचं जेवण करायला जात होती. एका मोकळ्या युनिटमधून जाताना तिला वाटलं की जे स्वप्न तिने पाहिलं होतं ते कँडी शॉप सुरू करण्यासाठी ही परफेक्ट जागा आहे.
या आंत्रप्रेन्युअरने गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून इंटर्नशिप केली. मग तिने ब्लॅकस्टोन ग्रुप, ॲपल आणि मायक्रोसॉफ्टमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केलं. अनुभवामुळे तिला या टेक कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळाल्या. पण तिने आर्थिक स्थिरतेला महत्त्व देणारी एक स्थलांतरित व्यक्ती म्हणून वेगळ्या उद्योगात जायचा निर्णय कठीण होता पण तिने तो घेतला. ती म्हणाली, "माझ्या आईने मला बचतीवर लक्ष देण्यास प्रोत्साहन दिलं. पण माझ्या मनात नेहमीच उद्योजकतेची भावना होती." बिग टेक कंपन्यांतील करिअरमधून सिक्युरिटी मिळते. पण तिने हेड ऑफ प्रॉडक्ट या पदावर एका ई-कॉमर्स स्टार्टअपमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. यामुळे तिचा उत्साह आणखी वाढला.
advertisement
कँडी शॉपचा विचार तिच्या डोक्यात खूप वर्षांपासून होता. कमी वयात स्थलांतर केल्याने ती अमेरिकेत लहानाची मोठी झाली. ती मित्रांबरोबर कोरियन स्नॅक्स खायची. वेगवेगळ्या संस्कृतीतील मित्र त्यांचे खाद्यपदार्थ तिच्याशी शेअर करायचे. "स्नॅक्स शेअरिंग विविध कल्चरबद्दल जाणून घ्यायची वेगळी पद्धत होती. यामुळे सर्वांना आनंद व्हायचा," असं तिने सांगितलं. इंटरनॅशनल स्वीट्ससाठी तिचं प्रेम वाढत गेलं. यासाठी तिने प्रवास केला. तिला तिच्या या प्रवासात जगभरातील कँडी शॉप्सची माहिती मिळाली. या प्रवासातून परतल्यावर तिला मित्र आणि कुटुंबाकडून तिच्या कल्पनेबद्दल पॉझिटिव्ह रिअॅक्शन मिळाल्या.
इंटरनॅशनल कँडीची वाढती लोकप्रियता पाहून तिला वाटले की हीच स्वप्न पूर्ण करायची योग्य वेळ आहे. तिने पतीबरोबर ते स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. तिने एक स्टोअर उघडलं आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मही लाँच केला. आर्थिक जोखीम असली तरीही तिला तिच्या निर्णयाची खात्री आहे. "एक स्थलांतरित असल्याने हा निर्णय आव्हानात्मक आहे, पण माझ्या आवडीमुळे मी ही जोखीम पत्करायला तयार आहे," असं ती म्हणाली.
