TRENDING:

ऑनलाइन ट्यूशन घेणारी कंपनी होती 18,37,59,29,00,00 रुपयांची, आता किंमत झाली झिरो!

Last Updated:

देशातील स्टार्टअप सेक्टरमध्ये जोरदार चर्चेत असलेल्या बायजू या एज्युटेक कंपनीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कर्जाच्या जाळ्यात अडकून ही कंपनी बुडल्यात जमा आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला गेला. या कालावधीत बायजू ही एज्युटेक कंपनी ऑनलाईन शिक्षणामुळे जोरदार चर्चेत आली. अॅप्सच्या माध्यमातून या स्टार्टअपने अनेकांना आकर्षित केलं. या कंपनीला मिळणारा प्रतिसाद पाहता, अनेक दिग्गजांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ही कंपनी जवळपास दिवाळखोरीत निघाल्यात जमा आहे. यामागे कंपनीची एक चूक कारणीभूत मानली जाते.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

देशातील स्टार्टअप सेक्टरमध्ये जोरदार चर्चेत असलेल्या बायजू या एज्युटेक कंपनीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कर्जाच्या जाळ्यात अडकून ही कंपनी बुडल्यात जमा आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाच्या जोरावर या कंपनीने मोठं यश मिळवलं. बायजू देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप कंपनी बनली. कंपनीचे मूल्यांकन 22 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 18,37,59,29,00,00 रुपये झालं. 2022 मध्ये ही कंपनी देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप बनली. पण बायजूची एक चूक भलतीच महागात पडली.

advertisement

कंपनीचा मालक बायजू रविंद्रनने 2015 मध्ये एक अॅप लाँच केलं होतं. ऑनलाईन अभ्यासक्रमाची तयारी, शिक्षणाची पद्धत कंपनीने बदलली. कोरोना आणि लॉकडाउन काळात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास बंद झाले, तेव्हा बायजूचा व्यवसाय वेगानं वाढला. कंपनीने लवकरच 22 अब्ज डॉलरचे मूल्यांकन मिळवले. त्यानंतर कंपनीने आकाश इन्स्टिट्युट, आय रोबो ट्युटर, हॅशलर्न, व्हाईट हॅट ज्युनिअर आणि टॉपरसारख्या अनेक कंपन्या अधिग्रहीत करण्यास सुरूवात केली. या कंपन्या खरेदी करण्यासाठी बायजूने 1.2 अब्ज डॉलरचं कर्जदेखील घेतलं. कर्जाचा भार वाढत असताना बायजूने गुंतवणूक देखील वाढवून घेण्यास सुरुवात केली. देशातील विविध भागांत कोचिंग सेंटर, बायजूची कार्यालये सुरू झाली. पण कोरोना आणि लॉकडाउन संपताच बायजूच्या अडचणी वाढू लागल्या. शाळा, महाविद्यालयं सुरू होताच बायजूचा व्यवसाय कमी होऊ लागला. लॉकडाउन संपताच विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणाकडे असलेला कल कमी झाला. यामुळे बायजूच्या व्यवसायाला धक्का बसला. एकेकाळी कंपनीचे मासिक उत्पन्न 30 कोटी होते तर खर्च 150 कोटी रुपयांपर्यंत होता. कंपनी कर्ज फेडण्यात अपयशी ठरत होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

दुसरीकडे, काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर बायजूचा लोगो होता. बॉलिवूड स्टार शाहरूख खान बायजूच्या जाहिराती करत होता. पण आज कंपनीचे मूल्य शून्य झाले आहे. आर्थिक फर्म एचएसबीसीने आपल्या अहवालात बायजूचे मूल्यांकन शून्यावर आणले आहे. एचएसबीसीने बायजूत गुंतवणूक केली होती. जी कंपनी एकेकाळी 22 अब्ज डॉलरची होती, ती आता शून्यावर आली आहे. एचएसबीसीने बायजूमधील तिचे अंदाजे 10 टक्के भागीदारीचे (सुमारे 500 दशलक्ष डॉलर) मूल्य शून्यावर आणले आहे. त्यामुळे बायजूच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
ऑनलाइन ट्यूशन घेणारी कंपनी होती 18,37,59,29,00,00 रुपयांची, आता किंमत झाली झिरो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल