युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामध्ये जॉइंट सेक्रेटरी, संचालक, उपसचिव यांसारख्या ४५ पदांसाठी थेट भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना संकेतस्थळावर पदासाठीची पात्रता आणि निकष इत्यादी माहिती मिळेल. प्रत्येक पदासमोर Apply Now या पर्यायावर क्लिक केल्यास संबंधित पदाबाबत आणि त्याच्या पात्रतेबद्दल माहिती मिळू शकते.
भारत सरकारच्या संयुक्त सचिव, संचालक आणि उप सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या लॅटरल भरती २०२४ साठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवार १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील. ३ वर्षांसाठी करार असणार आहे. तसंच दिल्लीतील मंत्रालय, विभागाच्या मुख्यालयात नियुक्ती असेल.
advertisement
खासगी कंपन्या, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच पीएसयूमध्ये काम केल्याचा अनुभव असलेल्यांना संधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी - कर्मचारी या पदांसाठी पात्र नाहीत. सहसचिव पदाच्या १० जागा आहेत. तर संचालक उपसचिव पदासाठी ३५ जागा असणार आहेत.
