TRENDING:

‘हे’ मेडिकल कॉलेज देणार मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना भरावी लागणार नाही एकही रुपया

Last Updated:

भारतातमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात डॉक्टर होणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलं नाही. कारण मेडिकल क्षेत्राशी संबंधित शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. लाखो रुपयांची ट्युशन फी, होस्टेलचा खर्च, अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च हा खूपच मोठा असतो. भारतातमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 10 लाख रुपयांपर्यंत आहे.
News18
News18
advertisement

तर, खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ही फी 60 लाख रुपयांपर्यंत आहे. या शिवाय, शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा हिशेब सहजासहजी करता येणार नाही. मात्र एका मेडिकल कॉलेजने तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. ट्युशन फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून एक रुपया घेणार नसल्याचं कॉलेजनं जाहीर केलंय. अर्थात याचे कारणही खूप खास आहे.

advertisement

बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये हे कॉलेज असून, त्याचे नाव अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला दरवर्षी 59 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 48 लाख 87 हजार रुपये ट्युशन फी भरावी लागते. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन ही फी भरतात; पण आता कॉलेजच्या प्रशासनाने येथील विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्याचा निर्णय घेतलाय.

advertisement

कॉलेजला मिळाली 1 अब्ज डॉलरची देणगी

विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्याचं कारण म्हणजे या कॉलेजला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची देणगी मिळाली आहे. वॉल स्ट्रीटमधील गुंतवणूकदार डेव्हिड सँडी गॉट्समन यांचं नुकतंच निधन झालं. गॉट्समन यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला होता. ही रक्कम गॉट्समन यांची पत्नी व ब्रोंक्स स्कूलमधील माजी शिक्षिका डॉ.रुथ गॉट्समन यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनला एक अब्ज डॉलर्सची देणगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रकमेतून कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरून त्यांना मोफत शिक्षण द्यावं, अशी विनंतीही त्यांनी कॉलेजला केली. त्यानंतर कॉलेजनं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

advertisement

एखाद्या शैक्षणिक संस्थेला मिळालेली सर्वांत मोठी देणगी

अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनचे डीन डॉ. यारोन योमर म्हणाले, ‘आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन शाळा, कॉलेजला मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. देणगी मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ट्युशन फी भरावी लागणार नाही. या देणगीमुळे आमच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कर्ज घेण्यापासून मुक्तता होईल. ते संशोधनावर लक्ष केंद्रित करू शकतील. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास चांगला होईल.’

advertisement

कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचा समावेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला असणारे 50 टक्के विद्यार्थी न्यूयॉर्कमधील असून, त्यापैकी 60 टक्के मुली आहेत. 29 टक्के विद्यार्थी भारत, चीन, जपानसह अनेक आशियाई देशांमधून आले आहेत. सुमारे 16 टक्के विद्यार्थी आफ्रिकन आहेत. डॉ. रूथ गॉट्समन याबाबत म्हणाल्या,‘मला एवढी महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मी माझ्या पतीची आभारी आहे. आईनस्टाईन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं, यासाठी मला देणगी द्यायची होती. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याने मी हे दान देऊ शकले. मी केलेल्या कृतीमुळे माझे पती जिथे असतील तिथे त्यांना नक्कीच आनंद झाला असेल.’

मराठी बातम्या/करिअर/
‘हे’ मेडिकल कॉलेज देणार मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना भरावी लागणार नाही एकही रुपया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल