वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेडगावचे रहिवासी असणारे वैभवचे आई-वडील गणेश आणि विमल सोनोने हे बांधकाम मजूर म्हणुन काम करतात. पण त्यांनी आपल्या मुलांना सामाजिक बदलासाठी प्रेरित केले. संत सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैभवने फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळुरू येथून डेव्हलपमेंट विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
advertisement
शिक्षण पूर्ण केल्यानंतर शहरात मोठ्या पगाराची नोकरी घेण्याचा पर्याय वैभवकडे होता. मात्र, समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम करायची प्रेरणा मिळाल्याने वैभव आणि त्याची पत्नी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेशातील दुर्गम आदिवासी भागात जावुन काम करायचा निर्णय घेतला. इथे काम करतांनाच जागतिक पर्यावरण धोरणांचा आदिवासी समुदाय, शेतकरी आणि महिला यांच्या जीवनावर होणारा परिणाम समजुन घेवुन त्यावर विस्तृत अभ्यास करण्याची जाणीव वैभवला झाली.
यूकेमध्ये राष्ट्रीय स्तरावर लीड्स विद्यापीठाचे प्रतिनिधित्व -
वैभव सध्या यूकेमधील लीड्स विद्यापिठात पर्यावरण आणि विकास या विषयात एमएससी शिकत आहे. याच्या तयारीसाठी एकलव्य संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामने वैभवला मार्गदर्शन केले होते. मागच्या वर्षी वैभवला ब्रिटिश सरकारच्या कॉमनवेल्थ शेअर्ड आणि चेवनिंग अशा दोन्ही स्कॉलरशिप जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी त्याने कॉमनवेल्थ शेअर्ड हि स्कॉलरशिप निवडली. यूकेमध्ये शिकत असतांना अभ्यासासोबतच अनेक महत्वाच्या गोष्टीमध्ये वैभवने आपली छाप उमटवली आहे. तो सध्या त्याच्या विषयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ‘राष्ट्रीय विद्यार्थी संघ’ डेलीगेट्सच्या निवडणुकीत वैभवने विजय मिळवला असुन आता तो यूकेमध्ये राष्ट्रीय स्तरावर लीड्स विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल.
यूकेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदाय-शेतकरी आणि महिला यांच्या संबंधित पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या प्रश्नांवर काम करायचा निर्णय वैभव याने घेतला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी त्याची पत्नी स्नेहल हिने देखील ‘शिक्षक आणि समुदाय यांचा समन्वय साधत सर्वांगीण बदलासाठी सर्वांगीण शिक्षण यावर काम करायचे ठरवले आहे.
भाऊ पायलट, बहीण वकील, पण शिक्षणानंतर तरुणीने निवडला शेतीचा मार्ग, फक्त 4 वर्षात कमावले 22 लाख रुपये
शिक्षण घेत असतांना मेळघाट येथे पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्याकडे युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देश्याने आयोजित होत असलेल्या ‘तरुणाई’ शिबिरांचा समन्वयक म्हणून त्याने काम पाहिलं आहे. डॉ. कोल्हे दांपत्याच्या सहवासात त्याचा ग्रामीण-आदिवासी क्षेत्रात काम करायचा निर्धार पक्का झाला.
आदिवासी महिलांना समर्पित केला सन्मान..
इंग्लंडच्या संसदेत होणारा हा सन्मान वैभवने ‘धमनपाणीच्या सगळ्या स्त्रियांना’ समर्पित केला आहे. “पर्यावरणाला विकासाचा केंद्रबिंदु न मानता आखली जाणारी धोरणे आणि कायदे हे अप्रासंगिक आहेत. येत्या काळातील जागतिक राजकारण आणि समाज जीवन हे नैसर्गिक साधन संपत्तीच्या मुद्द्याभोवती केंद्रीत असणार आहे. अशावेळी ज्याच्या जगण्यावर याचा सर्वाधिक परिणाम पडेल अशा आदिवासी-शेतकरी आणि महिलांची बाजु मांडत त्यांच्या क्षमतावर्धन करण्यावर आम्हा दोघांचा भर असेल“ असे त्याने न्यूज18 लोकल सोबत बोलताना सांगितले.
