दिल्ली : कोरोनाच्या संकटात अनेकांची आयुष्ये उद्धस्त झाली. अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना आपली नोकरी सोडावी लागली. तर अनेकांचे व्यवसाय बंद पडलं. मात्र, काही लोकांना त्यातून हार न मानता आपल्या आयुष्याचा प्रवास पुन्हा सुरू केला आणि आज ते समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले आहेत.
अशाच एक महिला म्हणजे दिल्ली येथील अनिता चौधरी. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अनिता यांना आपली नोकरी गमवावी लागली. पश्चिम दिल्लीच्या जनक सिनेमा येथील रहिवासी असलेल्या महिला अनिता चौधरी यांचे वय आता 52 वर्षे आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाकाळात त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला, ज्याचा परिणाम आज सर्वांना दिसत आहे.
advertisement
त्या म्हणाल्या, मागील 27 वर्षांपासून त्या कॉर्पोरेटमध्ये काम करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केले आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नोकरीचा प्रवास संपला. यानंतर लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या मनात आला की, पुन्हा एकदा जर महासंकट आले तर त्यांची नोकरी पुन्हा असुरक्षित राहील. म्हणजे पुन्हा नोकरी धोक्यात येईल. यासाठी त्यांना स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
अनीता म्हणाल्या की, मी एक स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्या माध्यमातून लोकांना घरचे जेवण देता येईल. यादरम्यान, अनेक लोकांचे सहकार्य मिळाले तर काही लोकांनी त्यांना आत्मविश्वास कमी करण्याची प्रयत्न केला. इतके वर्षे कॉर्पोरेटमध्ये नोकरी केल्यानंतर आता रस्त्यावर उभे राहून काम करणे, ही गंमत आहे, अशी खिल्लीही उडवली. मात्र, त्या म्हणाल्या की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. लोकांसमोर हात पसरणे योग्य नाही. त्यामुळे लोक मला इतके प्रेम करतात.
छत्रपती शिवरायांच्या 'या' शस्त्राला आता राज्यशस्त्र म्हणून मान्यता, काय आहे नेमका इतिहास आणि ओळख?
आज मी माझ्या स्टॉलला एका टेबलापासून मोठ्या स्टॉलपर्यंत आणले आहे. पहिल्यांदा जेव्हा स्टॉल सुरू केला तेव्हा, पहिल्या दिवसाची कमाई ही 70 रुपये होती. मात्र, आज लोकांचे प्रेम मिळत असून आता दिवसभरात याठिकाणी 50 ते 60 लोक आरामाने जेवण करत आहेत. याठिकाणी एका प्लेटची किंमत ही 50 ते 70 रुपये आहे, असे ते म्हणाले.