करनाल : प्रत्येक महिलांच्या आयुष्यात विविध प्रसंग येत असतात. नोकरी करणाऱ्या महिलेलाही विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळी काही महिला या खचून जातात. तर काही महिला या जिद्दीने नव्या प्रवासाची सुरुवात करतात आणि त्यात यशस्वी होऊन दाखवतात. आज अशाच एका महिलेच्या कर्तृत्त्वाची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
करनालच्या कर्ण विहार येथील रहिवासी असलेल्या खुशबू यांची ही कहाणी आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील 15 वर्षे मुलांच्या शिक्षणासाठी दिली. मात्र, एक वेळ अशी झाली की त्या आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सुट्टी हवी होती. मात्र, त्यांना शाळेने जास्त सुट्टी दिली नाही.
advertisement
या कारणामुळे त्यांनी शाळेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, त्यांना मुलांची आवड असल्याने त्यांनी आपल्या घरीच मुलांसाठी प्ले स्कूल सुरू केले. आता त्या मुलांसोबतही राहतात आणि या माध्यमातून आपली उपजीविकाही भागवत आहेत.
खुशबू यांनी सांगितले की, मागील दीड वर्षांपासून त्या आपल्या घरीच प्ले स्कूल चालवत आहेत. मागच्या वर्षी त्यांच्याकडे 15 विद्यार्थी होते. त्यांनी आपल्या प्ले स्कूलचे नाव Happy Mind Play Way स्कूल असे ठेवले आहे. आता त्यांच्या शेजारच्या लोकांना आपल्या मुलांनाही कुठेही दूर पाठवावे लागत नाही. कमी पैशात त्यांना आपल्या मुलासाठी चांगले प्ले स्कूल उपलब्ध झाले आहे. याठिकाणी त्यांची मुले येऊ शकतात आणि शिकू शकतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोक खूप आनंदी आहेत.
घरात ही वस्तू असेल तर आताच काढून बाहेर फेका, नाही तर पदरी येईल गरीबी, घरात होतील वाद
कुटुंबाची मिळाली साथ -
दरम्यान, त्यांच्या या कार्यामध्ये खूशबू यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोठी साथ मिळाली. त्यांच्या आईसुद्धा शिक्षिका होत्या. तसेच त्यांचे आजोबासुद्धा शाळेचे डायरेक्टर राहिलेले आहेत. त्यामुळे कुटुंब सुशिक्षित असल्याने त्यांनी खूशबू यांच्या स्वप्नांना साथ दिली आणि त्यांच्या या कार्यात सहकार्य केले.
इतर महिलांना दिला सल्ला -
खुशबू यांनी सांगितले की, अनेक महिला काहीतरी करण्याचा विचार करतात. मात्र, कुठल्या तरी कारणामुळे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. पण अशा महिलांनी पुढे जायला हवे आणि आपले स्वप्न पूर्ण करायला हवे, असा सल्ला त्यांनी इतर महिलांना दिला.