भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सिंग प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थीनी या प्राथमिक केंद्रामध्ये शिकाऊ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या एक महिन्यापासून त्या याठिकाणी काम करत आहेत. 7 मार्चच्या रात्री या मुली आपल्या कॉटरकडे जात होत्या. यावेळी गावातील काही समाजकंटक टवाळखोर तरुण परिसरातील भिंत ओलांडून आत घुसले, त्याने संबंधित मुलींचा विनयभंग करत, त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच द्विअर्थ शब्दांचा वापर केला.
advertisement
या प्रकारानंतर पीडित मुली घाबरल्या आणि त्यांनी राहत्या क्वॉर्टरकडे धाव घेतली. या मुली क्वार्टरमध्ये जातच क्वार्टरचे दार बंद करत असताना पुन्हा क्वार्टर जवळ येऊन या मुलींवर दगडफेक केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे या मुली एकदम घाबरून गेल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. आरडाओरड ऐकून परिसरातील डॉक्टर, नर्सेस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळी आले. यानंतर टवाळखोर तरुणांनी तिथून पळ काढला.
यानंतर पीडित मुलींनी आपले प्राचार्य, डॉक्टर यांच्यासह गंगाझरी पोलीस ठाण्यात जात 8 मार्चला त्या अज्ञात तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 329, 351(2) दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 तरुणांना ताब्यात घेतलं. एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.