नेमकं प्रकरण काय?
पीडित युवती ही अशोक विहार येथील लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकते. घटनेच्या दिवशी रविवारी ती कॉलेजच्या दिशेनं चालत जात होती. याचवेळी मुकुंदपूरचा रहिवासी असलेला आणि तिच्या ओळखीचा जितेंद्र नावाचा एक तरुण इशान आणि अरमान या साथीदारांना सोबत घेऊन बाइकवरून आला. यावेळी इशानने अरमानला एक बाटली दिली. त्याने तिच्यावर अॅसिड फेकले. तरुणीने प्रसंगावधान दाखवत आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या दोन्ही हातांना दुखापत झाली. तिच्यावर दीपचंद बंधू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा घेतला बदला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र हा अनेकदा तरुणाचा पाठलाग करत असायचा. एक महिन्यापूर्वी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. याच कारणातून आरोपीनं थंड डोक्याने प्लॅन करून हा अॅसिड हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल
या प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून सुओ मोटो दाखल करून घेतली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 5 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खालील सूचना केल्या आहेत:
आरोपींना तत्काळ अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. पीडितेला तत्काळ वैद्यकीय उपचार द्यावेत. तात्पुरते आणि अंतिम नुकसान भरपाई, मानसिक समुपदेशन (काउंसलिंग) आणि दीर्घकालीन पुनर्वसनाची (rehabilitation) सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी दिल्ली व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीमच्या नियमांचं पालन करावं. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता , 2023 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. BNSS कलम 357A व 357C चे पालन करावे, ज्यामध्ये पीडितेला संरक्षण आणि नुकसानभरपाई देण्याचे तरतुदी आहेत, असे महत्त्वाचे आदेश मबहिला आयोगाने दिल.
