Success Story : नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई

Last Updated:

स्वप्नं मोठी असतील, तर ती केवळ पगारात पूर्ण होऊ शकत नाहीत, हा विचार उराशी बाळगून नाशिकच्या नेहा गोसावी यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

+
नाशिकमध्ये

नाशिकमध्ये आता मिळणार अस्सल मुंबईचा वडापाव! उद्योजिका नेहा गोसावींचा 'ऋग्वेद' ब्रँड गाजवतोय मैदान.

नाशिक: स्वप्नं मोठी असतील, तर ती केवळ पगारात पूर्ण होऊ शकत नाहीत, हा विचार उराशी बाळगून नाशिकच्या नेहा गोसावी यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधीकाळी इतरांच्या हाताखाली काम करणाऱ्या नेहा आज ऋग्वेद मुंबईचा वडापाव या स्वतःच्या ब्रँडद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आज या व्यवसायातून त्या महिन्याला तब्बल 3 लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती त्यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
संघर्षातून मिळाली व्यवसायाची प्रेरणा
नेहा यांचे बालपण नाशिकमध्ये गेले. मात्र, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्याने त्यांना मुंबई गाठावी लागली. शिक्षण आणि घराचा खर्च पेलण्यासाठी त्यांनी मुंबईत नोकरी सुरू केली. मात्र, नोकरीच्या मर्यादित पगारात आपली मोठी स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, याची जाणीव त्यांना झाली. याच प्रेरणेतून त्यांनी धाकट्या बहिणीच्या मदतीने मुंबईचे लाईफलाईन असलेल्या वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
संकटावर मात आणि नाशिकमध्ये पुनरागमन
मुंबईत व्यवसाय स्थिरावत असतानाच कोरोना महामारीचे संकट आले आणि त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. दरम्यानच्या काळात नाशिकमधील तरुणाशी विवाह झाल्यानंतर नेहा पुन्हा आपल्या मूळ शहरात परतल्या. मुंबईतील व्यवसायाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी पुन्हा नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. पती आणि सासरच्या मंडळींच्या भक्कम पाठिंब्यावर त्यांनी नाशिकमध्ये ऋग्वेद मुंबईचा वडापाव या नावाने स्वतःचा ब्रँड लाँच केला.
advertisement
आज देतायत इतरांना रोजगार
एकेकाळी नोकरीसाठी धडपडणाऱ्या नेहा आज यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या व्यवसायाने नाशिककरांच्या जिभेवर चांगलीच चव रेंगाळली असून, हा वडापाव शहरात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. केवळ स्वतःची प्रगती न थांबवता, त्यांनी आज इतर काही व्यक्तींनाही रोजगार दिला आहे. संकटं कितीही आली आणि अडचणी वाढल्या तरी हार मानायची नाही, हे मी पक्कं ठरवलं होतं, असे नेहा अभिमानाने सांगतात.
advertisement
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेहा गोसावी यांची ही यशोगाथा आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement