लहानपणीचा प्रियकर अभयने प्रथम त्याची गर्लफ्रेंड प्रियाला गेस्ट हाऊसमध्ये बोलावले. त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर, हैवान प्रियकराने चाकू काढला आणि मुलीच्या शरीरावर सपासप वार केले. आरोपीने तिच्या शरीरावर एकूण 15 वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
शाळेपासून होते प्रेमसंबंध
पोलिसांना संशय आहे की, ही अचानक झालेली भांडणे नव्हती, तर अभयने सर्व काही पूर्वनियोजित केले होते. त्याने प्रियाला जाणीवपूर्वक गेस्ट हाऊसमध्ये नेले, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये आणि तो आपली योजना अमलात आणू शकेल. प्रिया आणि अभय दोघेही बेरहमपूरमधील लांजीपाली भागातील रहिवासी होते. दोघेही शाळेपासूनचे मित्र होते आणि तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. हळूहळू ते प्रेम अधिक घट्ट झाले, पण जसा काळ बदलला, तसे संबंधातही विष कालवले गेले.
advertisement
नोकरी गमावल्यानंतर संबंध बिघडायला लागले
अभय एका खाजगी कंपनीत काम करत होता, पण काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. यानंतर प्रियाचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. तिने पूर्वीसारखे अभयला महत्त्व देणे बंद केले आणि बहुतेक वेळा त्याला टाळू लागली. तिने त्याचे फोन कॉलही उचलणे बंद केले, ज्यामुळे दोघांमधील भांडणे वाढली. या सगळ्या गोष्टींमुळे अभय आतून तुटायला लागला होता.
या दरम्यान, अभयला समजले की प्रियाला वेगवेगळ्या मुलांकडून लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. हे त्याला सहन झाले नाही. त्याला वाटले की प्रिया त्याला सोडून दुसऱ्या कोणाची तरी होईल. तो रागाच्या आगीत जळत होता आणि त्याच आगीत त्याने सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : 16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडून लैगिंक अत्याचार, समोर आलं London कनेक्शन, पोलीस उचलणार मोठं पाऊल
हे ही वाचा : 2 बायका, 20 गर्लफ्रेंड आणि 10 महिलांशी शारीरिक संबंध! वर्दीचा वापर करून या माणसाने केला कहर!