TRENDING:

अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 16 करावं, तेव्हाच थांबतील गुन्हे, JJB चे माजी सदस्य नेमकं काय म्हणाले?

Last Updated:

कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये जोपर्यंत यामागील खरे गुन्हेगार पकडले जात नाहीत, तोपर्यंत अल्पवयीन आरोपींना सोडू नये. तसेच अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कठोर होऊ शकत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दीपक पांडेय, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

खरगोन : पुण्यातील कल्याणी नगर भागात मागच्या महिन्यात भीषण कार अपघात झाला. यानंतर या प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. यातच पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आई-वडील, आजी-आजोबा यांच्यासह आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला काही अटींवर जामीन देण्यात आला होता. यानंतर 17 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) बाल सुधारगृहात पाठवले. मात्र, या प्रकारच्या वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर मध्यप्रदेशातील खरगोन येथील निवासी डॉ. वसंत सोनी यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

advertisement

डॉ. सोनी हे बाल सुधार गृह खरगोन येथील माजी सदस्य आहेत. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये जोपर्यंत यामागील खरे गुन्हेगार पकडले जात नाहीत, तोपर्यंत अल्पवयीन आरोपींना सोडू नये. तसेच अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कठोर होऊ शकत नाही. त्यांना शिक्षा देता येत नाही. तसेच जामीनही सहज मिळतो. त्यामुळे मोठे गुन्हेगार किंवा मोठी टोळी अल्पवयीन मुलांमार्फत गुन्हे करवून घेतात, असेही ते म्हणाले.

advertisement

photos : महिला सरपंचाची कमाल, गावात सुरू केल्या अशा सुविधा की गावकरीही म्हणताय, वाह!

डॉ. बसंत सोनी हे पुढे म्हणाले की, पुण्यातील दारू कार अपघातातही ही बाब समोर आली आहे की, अल्पवयीन आरोपी हा दारूच्या नशेत होता. त्यामुळे पोलिसांनी "बिअर बारमध्ये अल्पवयीन व्यक्तीला दारू देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?" हे देखील पहावे. यावरही कारवाई व्हायला हवी. तसेच दुकानदाराने अल्पवयीन व्यक्तीला बिडी, सिगारेट, तंबाखू आणि दारू दिली तरी कठोर शिक्षा व्हावी, असा कायदाही सरकारने करावा, असे ते म्हणाले.

advertisement

शिक्षण MA, भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू केला हा व्यवसाय, आज वर्षाला 1 कोटीपेक्षा जास्त उलाढाल

कायद्याचे पालन व्हावे -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

खरगोन येथे मोठ्या प्रमाणात सिकलीगर समाजाचे लोक अवैधरित्या पिस्तूल बनवतात. तर पोलीस अल्पवयीन मुलांना पकडून बाल न्यायालयात हजर करतात. येथून अल्पवयीन मुलांना 500 रुपये दंड भरून सोडून दिले जाते. त्यामुळे खरे गुन्हेगार मुलांचा असा दुरुपयोग करतात. ते स्वतः वाचतात. यामुळे लोकांमधील भीती संपली आहे. गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे जोपर्यंत खरा गुन्हेगार पकडला जात नाही, तोपर्यंत अल्पवयीन आरोपीला सोडू नये. तसेच बाल न्याय मंडळामध्ये सुधारणा करून, अल्पवयीन आरोपीचे वय हे 18 वरुन 16 वर्षे केले जावे. या वयात मुलांना चांगले-वाईट कळते, असेही ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 16 करावं, तेव्हाच थांबतील गुन्हे, JJB चे माजी सदस्य नेमकं काय म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल