पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, 1 जुलै 2025 रोजी शाळेत दुपारच्या सुट्टीत शिक्षकाने अत्याचार केले आहे. दुपारच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर विद्यार्थिनीला एकटीला शाळेत थांबवून घेत आणि अत्याचार करत होता. मुलीला त्रास झाल्यानंतर तिने आरडाओरडा केला तर तिच्या पाठीवर, तोंडावर चापट मारत होता, असा आरोप शिक्षकाने केला आहे.
परप्रांतीय विद्यार्थिनीवर अत्याचार
advertisement
शिक्षक एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित मुलीला पुन्हा शाळेत येण्यासाठी भाग पाडले आणि मानसिक त्रास दिला, असे तक्रारीत नमूद आहे. एक महिन्यापासून हा त्रास सुरू होता. विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील सरपंच असलेल्या पत्नीच्या पतीने हस्तक्षेपातून प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपीच्या मदतीने पीडितेवर दबाव आणल्याचेही तक्रारदार महिलेने सांगितले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी ही परप्रांतीय आहे.
दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणी सचिन उत्तम पुंदे, आनंदनाथ रामनाथ दराडे, रावसाहेब सुभान दराडे, मुनव्वरखान सरवरखान पठाण आणि अफरिजा पठाण या आरोपींच्या विरोधात IPC कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(2), 74, 115(2), 351(2) आणि पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12, 17 आणि 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.