अकोला :अकोल्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील डाबकी रोड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपी तौहिद समीर बैद्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 4.30 च्या दरम्यान नातेवाईक गणपती पाहण्यासाठी गेल्यामुळे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत हा अत्याचार केला आहे. तर या प्रकरणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तौहिद याला बेड्या ठोकण्यासाठी एक पथक गठीत केलं असून त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी यापूर्वीही अनेक गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचा सध्या पोलीस कसून शोध घेण्यात येत आहे.
आरोपीवर कडक कारवाईची मागणी
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धडक देत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिस प्रशासनाने तातडीने आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, यासाठी समाजातील विविध घटकांकडूनही आवाज उठू लागला आहे.
डाबकी रोड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीचे जबाब नोंदवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीविरोधात कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या घटनेमुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांसाठी अधिक कडक कायदे आणि तत्काळ न्यायाची मागणी जोर धरत आहे.
हे ही वाचा :
घरात झोपली होती तरुणी, बापाने झोपेतच घोटला गळा मग..., महाराष्ट्राला हादरवणारी घटना!