‘आम्हाला मुलगी झाली’ असे सांगून केली फसवणूक
पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या पती आणि दोन मुलांसोबत अमरावतीमध्ये राहते. जून 2024 मध्ये तिला तिसऱ्यांदा दिवस गेले. 17 फेब्रुवारी रोजी तिने एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यावेळी सोबत जाऊ, भाची आणि नणंद-नंदोईही होते. मुलगी झाल्यावर ती माहेरी गेली. नामकरणानंतर ती सासरी परतली.
advertisement
याच दरम्यान, तिच्या नणंदेने आपल्या गावकऱ्यांना ‘आम्हाला मुलगी झाली’ असे खोटे सांगितले होते. गावात बदनामी होईल, या भीतीपोटी नणंदेने चिमुकलीच्या आईकडे विनवणी केली, “आम्ही गावकऱ्यांना मुलगी झाल्याचे खोटे सांगितले आहे. बदनामी टाळण्यासाठी आठ दिवसांसाठी आम्हाला तुझी मुलगी दे, नाहीतर आम्हाला मरायची वेळ येईल.” आईने होकार दिल्यावर ते चिमुकलीला घेऊन गेले.
बनावट कागदपत्रे बनवून धमकी
आठ दिवसांनंतर आईने मुलीला परत घेण्यासाठी फोन केला, पण नणंद-नंदोईने फोन कट केला आणि नंबर ब्लॉकही केला. दोन-तीन महिने उलटल्यानंतर मुलीचे वडील पोलिसांत तक्रार दाखल करायला निघाले, पण त्यांच्या आईने (चिमुकलीच्या आजीने) “बाळ तिकडेच राहू द्या, नाहीतर ते काहीतरी वाईट करून घेतील,” असे सांगून त्यांना थांबवले.
जूनच्या शेवटी चिमुकलीचे आई-वडील नणंदेच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात वादावादी झाल्यावर नणंदेने मुलगी परत आणून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दुसऱ्याच दिवशी ‘तुला जे करायचे ते कर, मी मुलगी परत देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
सर्वात धक्कादायक बाब तेव्हा समोर आली, जेव्हा नेर पोलिसांनी 23 जून रोजी चिमुकलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की त्यांच्याविरुद्ध नणंदेने तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर मुलीच्या आई-वडिलांना कळले की, त्यांच्या मुलीच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर, आधार कार्डवर आणि डिस्चार्ज कार्डवरही आई-वडील म्हणून नणंद-नंदोईचे नाव होते. ही सगळी कागदपत्रे बनावट तयार केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हे ही वाचा : Suhagraat : दुधाचा ग्लास, फुलांनी सजवलेला बेड आणि लाजणारी नवरी, अजब आहे सुहागरातची रिअल स्टोरी
हे ही वाचा : सासू-सुना-जावा ऐकमेकींना भिडल्या; कोण सोडणार 'लाडक्या बहिणी'च्या 1500 रुपयांवर पाणी?
