सासू-सुना-जावा ऐकमेकींना भिडल्या; कोण सोडणार 'लाडक्या बहिणी'च्या 1500 रुपयांवर पाणी?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
नांदेडसह राज्यभरात 'लाडकी बहीण' योजनेला सरकारने नवीन नियमांच्या आधारे कात्री लावली आहे. सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने, सरकारने आता लाभार्थी...
नांदेड : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुती सरकारने घाईघाईत आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला आता शासनाकडूनच कात्री लावली जात आहे. या योजनेसाठी नवीन नियम लागू करण्यात आले असून, त्यामुळे अनेक महिलांचा पत्ता कट होणार आहे. विशेषतः एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे. या निर्णयामुळे घराघरात सासू-सुना आणि जावा-जावांमध्ये ‘1500 रुपयांवर कोण पाणी सोडणार’ यावरून वाद वाढले आहेत.
योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण
लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. त्यावेळी पात्र-अपात्र असे कोणतेही निकष न ठेवता, सरसकट सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले. काही महिने खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांनीही भरभरून मते देऊन महायुतीला पुन्हा सत्तेत आणले.
मात्र, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. अनेक योजनांसाठीचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे आता निधीची कमतरता भासू लागल्याने सरकारची दमछाक होत आहे. याच कारणास्तव सरकारने आता निकषांची चाळणी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
advertisement
नांदेड जिल्ह्यात 8 लाख 42 हजार बहिणींना योजनेचा लाभ मिळत असून 63 महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर घेतली आहे. आता अंगणवाडी ताईंकडून घराघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत नेमक्या किती महिलांना योजनेतून काढले हे मात्र पुढे आले नाही.
अपात्र ठरवण्याचे नवीन नियम
- एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील.
- शासकीय नोकरदार महिला.
- ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्या कुटुंबातील महिला.
- ज्या महिलांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त आहे.
advertisement
या छाननीमुळे एकाच घरातील अनेक महिलांना दीड हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे ‘1500 रुपयांवर कोण पाणी सोडणार’ यावरून सासू-सुना आणि जावा-जावांमध्ये जोरदार वादाला तोंड फुटले आहे.
हे ही वाचा : Income Tax Filing: तुम्ही ITR भरला का? ही तारीख चुकली तर 10,000 भरावा लागेल दंड, आताच चेक करा
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
सासू-सुना-जावा ऐकमेकींना भिडल्या; कोण सोडणार 'लाडक्या बहिणी'च्या 1500 रुपयांवर पाणी?


