'ई-शिवाई' लय भारी! प्रवाशांनी शिवनेरी-शिवशाहीकडे फिरवली पाठ; कोल्हापूरकर म्हणतात की...

Last Updated:

कोल्हापूर ते पुणे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी आता आरामदायी आणि प्रदूषणमुक्त 'ई-शिवाई' बसला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शिवनेरी आणि शिवशाही... 

E-Shivai Bus
E-Shivai Bus
कोल्हापूर : कोल्हापूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता ‘ई-शिवाई’ बसला पसंती दिली आहे. ई-बसमधील प्रवास आरामदायी असल्याने शिवनेरी आणि शिवशाही बसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना अनेकदा वाट पाहावी लागते. सध्या कोल्हापूर आणि स्वारगेट आगारातून प्रत्येकी 6 अशा एकूण 12 ई-शिवाई बसेस धावत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, बसेसची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ला प्रतिसाद कमी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर पहाटे 5 वाजल्यापासून ई-शिवाई बससेवा सुरू आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, ‘शिवशाही’ बसेस अनेकदा रस्त्यात बंद पडतात किंवा त्यांना आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, शिवशाही बसमधील स्वच्छता आणि आसन व्यवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आता ‘ई-शिवाई’ला अधिक पसंती दिली आहे.
advertisement
तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी
‘ई-शिवाई’ बससेवा चांगली असली, तरी गेल्या काही महिन्यांत तिकिटाच्या दरात मोठी वाढ झाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. आधी 500 रुपये असलेले तिकीट आता 623 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. कोल्हापूर आगार व्यवस्थापकांनी सांगितले की, “प्रवाशांची मागणी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच आणखी बसेस ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.”
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोल्हापूर/
'ई-शिवाई' लय भारी! प्रवाशांनी शिवनेरी-शिवशाहीकडे फिरवली पाठ; कोल्हापूरकर म्हणतात की...
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement