Pune Police: पोलिसांना मिळाली नवीन 'दृष्टी', नागरिकांच्या सुरक्षेची गुणवत्ता वाढणार
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Police: राज्याची सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.
पुणे: शहर पोलीस दलाच्या ताफ्यात नुकतीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली पाच 'दृष्टी' वाहनं दाखल झाली आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी, ही नवी वाहनं महत्वाची ठरणार आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक पवार यांनी लोकल 18शी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली.
ही दृष्टी वाहने केवळ वाहतूक नियंत्रणापुरती मर्यादित नसून, त्यामध्ये आधुनिक एआय कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, रिअल-टाईम डेटा ट्रान्सफर सुविधा, तसेच रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्रण करणाऱ्या नाईट व्हिजन तंत्रज्ञानाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हे घडण्याआधीच त्यावर लक्ष ठेवणे आणि तातडीने कार्यवाही करणं अधिक सोपं होईल.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनांमध्ये 360 अँगल सीसीटीव्ही कव्हरेज, थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेली ऑडिओ-व्हिडिओ कम्युनिकेशन सिस्टीम, तसेच गुन्हेगारांच्या हालचालींचा मागोवा घेणारे सॉफ्टवेअर बसवलेलं आहे आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या भागात, तसेच विशेष मोहिमांदरम्यान पोलिसांना या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक पवार म्हणाले, "शहरातील प्रमुख चौक, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले भाग, उत्सव किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी सुरक्षेसाठी या वाहनांचा वापर केला जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ही वाहने त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहाय्य करतील."
advertisement
या नव्या दृष्टी वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे पोलिसांचं तांत्रिक सामर्थ्य वाढले आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची पातळी अधिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 11, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Pune Police: पोलिसांना मिळाली नवीन 'दृष्टी', नागरिकांच्या सुरक्षेची गुणवत्ता वाढणार

