advertisement

Pune News: गुढीपाडव्यासाठी लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना झालं काय?

Last Updated:

Pramod Sawant: गुढीपाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते. प्रमोद सावंत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुढीपाडव्यासाठी लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना झालं काय?
गुढीपाडव्यासाठी लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना झालं काय?
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते. प्रमोद सावंत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गुरुवारी (१९ मार्च) दुपारी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री सावंत हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलीला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना गुरुवारी दुपारी छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची अँजिओग्राफी केली असता, हृदयात एक 'ब्लॉक' आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीरित्या पार पाडली.
advertisement
विशेष म्हणजे, १९ मार्च हा दिवस डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. २०१९ मध्ये याच दिवशी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काल त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला ७ वर्षे पूर्ण झाली. या वर्धापनदिनाच्या दिवशीच त्यांच्यावर शस्त्रक्रियेची वेळ आल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: गुढीपाडव्यासाठी लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना झालं काय?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement