ST Service: दोन दिवसांत अष्टविनायक दर्शन! महिला आणि ज्येष्ठांना मिळतेय विशेष सवलत
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
ST Service: दोन दिवसांच्या या यात्रेत मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव या अष्टविनायक गणपती मंदिरांचे दर्शन घडवले जाते.
पुणे: येत्या 12 ऑगस्ट रोजी असलेल्या अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) आगारातून भाविकांसाठी अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे भाविकांना महाराष्ट्रातील आठ प्रसिद्ध गणपती मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. एस.टी. महामंडळाच्या या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
दोन दिवसांत आठ गणपतींचे दर्शन
ही विशेष बस दररोज सकाळी 7 वाजता वल्लभनगर आगारातून सुटते. दोन दिवसांच्या या यात्रेत मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव या अष्टविनायक गणपती मंदिरांचे दर्शन घडवले जाते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजित पद्धतीने दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.
advertisement
विशेष सवलतींचा लाभ
या प्रवासादरम्यान महिलांना आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात 50 टक्के सवलत दिली जात आहे. तर, 75 वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे. या अष्टविनायक यात्रेसाठी भाविकांनी आरक्षण करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा उपक्रम भाविकांसाठी सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे.
advertisement
"चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांना अष्टविनायक दर्शनाची संधी मिळावी, यासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कमी खर्चात सुरक्षित प्रवास व्हावा, अशी इच्छा असलेल्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. 'एमएसआरटीसी'च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा वल्लभनगर आगारात तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे," अशी माहिती आगारप्रमुख बालाजी सुर्यवंशी यांनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 11, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
ST Service: दोन दिवसांत अष्टविनायक दर्शन! महिला आणि ज्येष्ठांना मिळतेय विशेष सवलत


