Income Tax Filing: तुम्ही ITR भरला का? ही तारीख चुकली तर 10,000 भरावा लागेल दंड, आताच चेक करा

Last Updated:

मोदी सरकारने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. 31 डिसेंबरपर्यंत दंड भरून फाइल करता येईल. 5 लाखाच्या उत्पन्नावर 5000 रुपये दंड आकारला जाईल. वेळेवर आयटीआर फाइल करणं गरजेचं आहे.

News18
News18
मोदी सरकारने इनकम टॅक्स स्लॅब वाढवून 12 लाख रुपये केल्याने तुम्ही खूश होऊन आयटीआर भरत असाल तर थांबा! याचं कारण म्हणजे हा या आर्थिक वर्षासाठी असणार आहे. मागील आर्थिक वर्षासाठी मात्र तुम्ही निवडलेल्या पद्धतीनं आयटीआर भरावा लागणार आहे. तुम्ही हा अजूनही भरला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही शेवटची तारीख चुकवलीत तर पुन्हा आयटीआर भरायची संधी नसेल थेट दंड भरावा लागेल.
आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. या तारखेनंतर आयटीआर भरता येत नाही. थेट दंडाची रक्कम भरावी लागते. 31 जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची तारीख होती. मात्र ती वाढवण्यात आली आहे. आता 15 सप्टेंबरपर्यंत ITR फाइल करता येणार आहेत. जर तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही आयटीआर भरला नाही तर 31 डिसेंबरपर्यंत दंड भरुन तुम्ही तो फाइल करु शकता. जर एखादी व्यक्ती काही विशिष्ट परिस्थितींमुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करू शकत नसेल, तर तो 'अपडेटेड रिटर्न' देखील भरू शकतो यासाठी काही विशेष अटींचं पालन देखील करावं लागतं.
advertisement
15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या उत्पन्नातून टॅक्सची रक्कम कापून घेतली जाईल. 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण आगाऊ कर भरला नाही तर थकीत कर रकमेवर व्याजही भरावं लागेल. 5 लाखाच्या उत्पन्नावर 5000 रुपये दंड आकारला जाईल. 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नावर 1000 रुपये दंड आकारला जाईल. 15 सप्टेंबरनंतर तुम्हाला आयटीआर दाखल करता येणार नाही. त्यामुळे वेळेवर आयटीआर फाइल करणं जास्त गरजेचं आहे.
advertisement
आयटीआर भरण्यासाठी तुम्ही Income Tax साइटवर लॉगइन करुन स्वत: भरु शकता. त्यासाठी तुम्हाला PAN नंबर, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तुम्ही स्वत: रजिस्टर करुन ITR भरू शकता. CA ची मदत घेऊन देखील तुम्ही भरू शकता. मात्र तुमच्याकडे आता 32 दिवसच शिल्लक राहिले आहेत.
मराठी बातम्या/मनी/
Income Tax Filing: तुम्ही ITR भरला का? ही तारीख चुकली तर 10,000 भरावा लागेल दंड, आताच चेक करा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement