अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील तिलक नगर रोडवर नंदुरवा येथील महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्येचा अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी तपास करत 24 तासात पाच आरोपींना अटक केली. यातील तीन आरोपी विधीसंघर्षित बालक आहेत. मात्र ही हत्या सुपारी देऊन घडून आणली अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे अद्यापही या हत्याचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. हत्या केल्यानंतर शस्त्राचा मार हाताला लागल्याने दोन आरोपी जखमी झाले होते. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन ते फरार झाले होते. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, नेमकं हत्येचं कारण काय याचा शोध तपास अमरावती शहर गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण हे करत आहे.
रस्त्यात अडवले अन् सपासप वार केले
अतुल पुरी हे नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता महाविद्यालयात निघाले होते. त्यांनी आपली दुचाकी बडनेरा रेल्वे स्थानकावर ठेवली त्यानंतर रेल्वेने नांदुरा महाविद्यालयात चालले होते. रेल्वेतून उतरल्यानंतर अतुली पुरी यांना रस्त्यात अडवून त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्याक आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि आरोपी फरार झाले.