इथं सविता देवी नावाच्या महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. तिने सोनमपेक्षाही भयंकर पद्धतीने तिचा पती रणजीत रामला संपवलं आहे. बिहारमधील मधेपुराच्या बुद्धीगावात हा खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्याकांडाची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची तुलना राजा रघुवंशी मर्डर केसशी केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी सविताला अटक केली आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मधेपुराच्या बुद्धी गावात २४ वर्षीय रणजीत राम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. असा आरोप आहे की, त्यांची पत्नी सविता देवीचे तिच्या माहेरच्या घरात दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रात्री उशिरा सविताने रणजीतचा गळा चिरून हत्या केली.
हत्येनंतर सविताने रणजीतचा मृतदेह तिच्या साडीने फासावर लटकवला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मोबाईलही तोडला. पोलिसांनी सविता यांना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे. रणजीतच्या आईने सांगितले की, लग्नाच्या तीन वर्षांनंतरही दोघांमध्ये तणाव होता. सविता बहुतेकदा तिच्या आईवडिलांच्या घरी राहत असे आणि घटनेच्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी तिला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकले होते. याची माहिती रणजीतला मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हत्येच्या या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले आहे. रणजीत हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.