TRENDING:

किरकोळ वादाचं गँगवॉरमध्ये रुपांतर, भाजपच्या माजी आमदाराने विद्यमान आमदारावर झाडल्या गोळ्या

Last Updated:

BJP Former MLA Firing: रविवारी भाजपच्या एका माजी आमदाराने विद्यमान आमदारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रविवारी भाजपच्या एका माजी आमदाराने विद्यमान आमदारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता. रविवारी या वादाचं रुपांतर थेट टोळीयुद्धात झालं. भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या समर्थकांसह विद्यमान आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर धडक मारली आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी, माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन आणि त्यांच्या काही समर्थकांना घेऊन जाणारी तीन वाहने उत्तराखंडमधील खानपूरचे विद्यमान आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचली. प्रत्येकाच्या हातात शस्त्र होते. गाडीतून उतरताच सर्वांनी उमेश कुमारच्या ऑफिसवर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विद्यमान आमदार उमेश कुमार आणि माजी आमदार चॅम्पियन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू होती. या घटनेला रविवारी हिंसक वळण मिळालं. गोळीबाराची माहिती मिळताच संतप्त झालेले खानपूरचे आमदार उमेश कुमार यांनी हातात पिस्तूल घेऊन प्रति गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आणि इतर लोकांनी त्यांना रोखलं. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

या प्रकरणी देहरादून पोलिसांनी कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन यांना अटक करून हरिद्वार पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अटकेनंतर आता चॅम्पियन यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना, चॅम्पियन म्हणाले की, "माझ्यावर अन्याय होत आहे." चॅम्पियन यांच्या पत्नीनं सांगितलं की, या वादाची सुरुवात आमदार उमेश कुमार यांनी केली होती. आम्हाला पोलिसांकडून सहकार्य मिळत नाहीये.

advertisement

या सगळ्या घडामोडीनंतर चॅम्पियन यांची पत्नी देवयानी यांनीही आमदार उमेश कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. देवयानी यांनी आरोप केला आहे की उमेश कुमार आमच्या घरात घुसला आणि माझा पती प्रणव चॅम्पियन आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुलांना शस्त्र दाखवून धमकावले. ही एफआयआर रुरकी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

advertisement

प्रणव सिंग चॅम्पियनच्या अटकेबद्दल आमदार उमेश कुमार म्हणाले, 'कुंवर प्रणव सिंग चॅम्पियनचे उमेदवार लंधौरा आणि धांडेरा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. यानंतर, त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माझ्या आईविरुद्ध अपशब्द वापरले. त्यामुळे सोशल मीडियावर शाब्दिक चकमक झाली. आज त्यांनी आणि त्यांच्या ५० समर्थकांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी सुमारे ५० राउंड फायर केल्या आहेत. एखाद्या विद्यमान आमदारावर अशाप्रकारे हल्ला झाल्याचं मी कधीही पाहिलं नाही, असं उमेश कुमार म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
किरकोळ वादाचं गँगवॉरमध्ये रुपांतर, भाजपच्या माजी आमदाराने विद्यमान आमदारावर झाडल्या गोळ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल