ही घटना उत्तर प्रदेशमधील हापूरच्या गढमुक्तेश्वर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुलबेज असं आरोपीचं नाव आहे. तो रामपूरच्या शहजाद नगरचा रहिवासी आहे. त्याची प्रेयसी मुस्केजहान ही देखील त्याच परिसरातील रहिवासी होती. गेल्या चार-पाच वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
आता गुलबेज आणि मुस्केजहान दोघेही घरातून पळून नोएडाला जात होते. मात्र मध्येच दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. गढमुक्तेश्वर परिसरातील फुलडी कालव्याजवळ आल्यावर गुलबेज आणि मुस्केजहानमध्ये भांडण सुरू झालं. दरम्यान, गुलबेजने चाकू काढून मस्केजहानवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.
advertisement
Crime News: विष टाकून पत्नी आणि मुलाला खायला दिला वडापाव, अन् मग..छ. संभाजीनगरमधील घटना
गुलबेजने प्रेयसीचा मृतदेह कालव्याजवळ टाकून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर त्यानी स्वतः 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुकेश मिश्रा यांनी सांगितलं की, एका तरुणाने 112 वर कॉल करून कळवलं होतं की, त्याने आपल्या प्रेयसीला कालव्याजवळ भोसकून मारलं आहे.
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून नंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या सांगण्यावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
