Crime News: विष टाकून पत्नी आणि मुलाला खायला दिला वडापाव, अन् मग..छ. संभाजीनगरमधील घटना
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा आणि मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने वडापावमध्ये विष टाकून पत्नी आणि मुलाला मारण्याचा प्रयत्न केला.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर 21 ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ही प्रकरणं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. आता छ. संभाजीनगरमधून आणखी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा आणि मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने वडापावमध्ये विष टाकून पत्नी आणि मुलाला मारण्याचा प्रयत्न केला.
कौटुंबिक वादातून ही घटना घडली. या वादाच्या रागात व्यक्तीने पत्नी आणि पोटच्या मुलाला वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आला आहे. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
advertisement
या वादातूनच तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख ईब्राहीम, शेख युनूस शेख याकूब, फुरखान यांच्या मदतीने वडापावमध्ये विष कालवलं. यानंतर हा वडापाव पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी देत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वडापावमध्ये वास येत असल्याने पत्नीने ते न खाता फेकून दिलं आणि जीव वाचला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती शेख इसाक याच्यासह पाच नातेवाईकांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
advertisement
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या
view commentsनुकतीच आणखी एक हादरवणारी घटना छ. संभाजीनगरमधून समोर आली होती. यात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहराजवळ असलेल्या रजाळवाडी शिवारात घडली. प्रदीप गंगाराम आरके असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. याच त्रासाला कंटाळून पतीने टोकाचं पाऊस उचललं. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं प्रदीप यांच्याजवळ आढळून आलेल्या सुसाईट नोटमध्ये सांगितलं गेलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2023 8:30 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Crime News: विष टाकून पत्नी आणि मुलाला खायला दिला वडापाव, अन् मग..छ. संभाजीनगरमधील घटना


