Weekly Horoscope: 26 जानेवारीपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: येत्या नवीन आठवड्यात (26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026) ग्रहांची स्थिती अत्यंत सक्रिय राहणार असून ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत स्थिर आहे, तर चंद्र मेष राशीतून मिथुन राशीपर्यंत वेगाने भ्रमण करेल. गुरु ग्रह मिथुन राशीत असून त्याची कुंभ राशीतील बुध, शुक्र आणि शनी यांच्याशी होणारी दृष्टीभेट बौद्धिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल ठरेल. एकंदरीत ग्रहस्थितीवरून मेष ते मीन 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष - या आठवड्यात मेष राशीच्या लोकांनी घाई टाळावी. कुठलेही काम घाईघाईत करू नका आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आठवड्याच्या पहिल्या भागात कामात निष्काळजीपणा टाळावा, नाहीतर वरिष्ठांचा रोष ओढवू शकतो. या काळात ऑफिसमधील विरोधकांपासून आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळे आणणाऱ्या लोकांपासून सावध रहा. आठवड्याचा पहिला भाग आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने फार अनुकूल नाही. लोकांशी बोलताना नम्रता ठेवा. आहार आणि दिनचर्या सांभाळली नाही तर शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवू शकतो. नोकरीच्या शोधात असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात आशेचा किरण दिसेल. या काळात केलेले प्रयत्न यश देऊ शकतात, त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यासाठीही हा काळ चांगला असेल.भाग्यवान रंग: लालभाग्यवान क्रमांक: 8
advertisement
वृषभ - या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांनी ऊर्जा, पैसा आणि वेळ योग्य पद्धतीने वापरला तर मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आठवड्याची सुरुवात काही मोठ्या खर्चाने होऊ शकते. वैयक्तिक अडचणी सोडवण्यात वेळ जाईल. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मुलांशी संबंधित किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावू शकते, पण या कठीण काळात आप्तस्वकीय साथ देतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि वैयक्तिक आयुष्यात मित्र-नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. अडचणी असूनही आर्थिक प्रगती दिसेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या शेवटी चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मोठा व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसाय वाढेल. नातेसंबंधांच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा राहील. प्रेमसाथीदारासोबत चांगले क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवन सुखकर राहील आणि जोडीदार अडचणींमध्ये मदत करेल.भाग्यवान रंग: निळाभाग्यवान क्रमांक: 9
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच भाग्यशाली ठरेल. अनेक कामं अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला काम किंवा व्यवसायानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो, जो सुखद आणि फायद्याचा ठरेल. प्रवासात प्रभावी लोकांची भेट होईल. मर्यादित साधनांतूनही मोठं यश आणि नफा मिळवता येईल. व्यवसायात घेतलेले योग्य निर्णय सध्याच नाही तर भविष्यातही फायदा देतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो. कामं वेळेवर पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. नातेसंबंध स्थिर राहतील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भावंडांशी प्रेम आणि सलोखा राहील. संवाद आणि तडजोडीमुळे वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न सुटू शकतो. प्रेमसंबंध अनुकूल राहतील. अविवाहितांसाठी लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतात. घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे.भाग्यवान रंग: हिरवाभाग्यवान क्रमांक: 4
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला भाग मध्यम स्वरूपाचा असेल, तर उत्तरार्ध अधिक चांगला ठरेल. त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. सुरुवातीला घर, कुटुंब किंवा कामाशी संबंधित चिंता वाढू शकते. जमीन-जुमल्याच्या वादांसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना मेहनत जास्त घ्यावी लागेल. या काळात प्रेम आणि सहकार्याने कामं पूर्ण होतील, हट्ट केल्यास बिघाड होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस कमी होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी मोठ्या खर्चामुळे अध्यात्माकडे लक्ष कमी जाईल, पण कामातील सुधारणा सकारात्मक परिणाम देतील. नातेसंबंध टिकवण्यासाठी गैरसमज टाळा. प्रेमात सावधपणे वागा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या.भाग्यवान रंग: पिवळाभाग्यवान क्रमांक: 8
advertisement
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून यश आणि शुभता मिळेल. कठीण कामंसुद्धा तुमच्या बुद्धीच्या जोरावर पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्तीमुळे मोठी अडचण सुटेल. ऑफिसमध्ये कामाचं कौतुक होईल आणि पद व प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायासाठीही आठवडा अनुकूल आहे. आर्थिक लाभ मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. साठवलेला पैसा वाढेल. आठवड्याच्या शेवटी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. नातेसंबंध चांगले राहतील. भावंडांशी प्रेम आणि विश्वास वाढेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. पालकत्वाचा आनंद मिळू शकतो.भाग्यवान रंग: काळाभाग्यवान क्रमांक: 9
advertisement
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र फल देणारा असेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका. आठवड्याच्या सुरुवातीपासून आरोग्य थोडं कमजोर राहू शकतं. कामात उशीर किंवा अडथळे आल्यामुळे मन अस्वस्थ राहील आणि स्वभावात चिडचिड जाणवेल. आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही सांभाळावे लागतील. आठवड्याच्या मध्यात मुलांशी मतभेद होऊ शकतात. आरोप किंवा वाद निर्माण होतील असं काही करू नका. आर्थिक व्यवहार आणि खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधताना त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसाय थोडा मंद राहील. प्रेमप्रकरणात फार दिखावा टाळा, नाहीतर अपमान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडी खटपट असली तरी परिस्थिती सामान्य राहील.भाग्यवान रंग: नारंगीभाग्यवान क्रमांक: 4
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ थोडं उशिरा किंवा कमी प्रमाणात मिळू शकतं, त्यामुळे मन निराश होऊ शकतं. कामात अडथळे आणि घरच्यांचा कमी पाठिंबा चिंता वाढवेल. कोणतेही काम करताना शॉर्टकट किंवा नियमभंग टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. व्यवसायात असाल तर जास्त नफ्याच्या अपेक्षेने धोकादायक गुंतवणूक करू नका. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मोठे निर्णय घेण्याआधी हितचिंतकांचा सल्ला घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आपली कामं स्वतः पूर्ण करावीत आणि भावनेतून निर्णय घेऊ नयेत. नवीन नोकरीत वरिष्ठांचा स्वभाव समजून घेऊन काम करा, नाहीतर सर्वांसमोर सुनावणी होऊ शकते. घरगुती प्रश्न सोडवताना मोठ्यांचा सल्ला घ्या. स्वतःचं आणि वडिलांचं आरोग्य सांभाळा.भाग्यवान रंग: गुलाबीभाग्यवान क्रमांक: 3
advertisement
वृश्चिक - या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी धीर न सोडता योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या पहिल्या भागात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. बाजारातील घसरण आणि स्पर्धकांचा दबाव जाणवेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त राहील. या काळात केलेला प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फायद्याचा ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत थोडा दिलासा मिळेल, पण मेहनत सुरूच ठेवावी लागेल. कोणत्याही वादात तडजोड केली नाही तर प्रश्न लांबू शकतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी जुन्या गोष्टी उगाळू नका. प्रेमसंबंधात संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील.भाग्यवान रंग: तपकिरीभाग्यवान क्रमांक: 6
advertisement
धनू - धनू राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र ठरेल. काम आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणी ओळखण्यात चूक होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला मोठे खर्च आणि जुनी देणी फेडावी लागू शकतात, त्यामुळे बजेट बिघडेल. नोकरी करणाऱ्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कोणत्याही वादात पडू नका आणि भांडण टाळा. व्यवसायात मोठे निर्णय घेताना बाजारस्थिती लक्षात ठेवा आणि धोकादायक गुंतवणूक टाळा. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक केलेले व्यवहार नफा देतील. नातेसंबंध सुधारण्यासाठी कमी बोला आणि जास्त ऐका. प्रेमात जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कठीण काळात जोडीदार तुमचा आधार ठरेल.भाग्यवान रंग: जांभळाभाग्यवान क्रमांक: 7
advertisement
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा अस्थिर राहील. नोकरी करणाऱ्यांवर अचानक कामाचा ताण वाढेल. मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने निराशा येऊ शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आठवड्याच्या पहिल्या भागात घरात तणावाचे वातावरण राहील. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद तीव्र होऊ शकतात. मुलं किंवा जोडीदाराशी संबंधित चिंता वाढेल. अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पळ काढावासा वाटेल, पण समस्या टाळून सुटत नाहीत हे लक्षात ठेवा. जबाबदाऱ्या स्वीकाराव्याच लागतील. नातेसंबंध टिकवण्यासाठी नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा आणि कुजबुज करणाऱ्यांपासून दूर राहा. प्रेम व्यक्त करण्यासाठी घाई न करता योग्य वेळेची वाट पाहा.भाग्यवान रंग: गुलाबीभाग्यवान क्रमांक: 4
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा साधारण राहील. आठवड्याच्या सुरुवातीला काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. खर्च वाढेल, पण त्याचबरोबर उत्पन्नही सुरू राहील. जमीन किंवा मालमत्तेचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो, मात्र कागदपत्रांची काळजी घ्या, कारण छोटी चूक पुढे अडचण ठरू शकते. आठवड्याच्या मध्यात नियम तोडणे किंवा खोटं बोलणं टाळा, नाहीतर अपमान होऊ शकतो. नोकरीत बदलाचा विचार मनात येईल, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. व्यवसायात धोकादायक गुंतवणूक टाळा. नातेसंबंधांत तक्रारी वाढू शकतात. पूर्वी बोललेले शब्द अडचणीत आणू शकतात. प्रेमात उतावळेपणा टाळा आणि जोडीदारासाठी वेळ काढा, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहील.भाग्यवान रंग: पांढराभाग्यवान क्रमांक: 1
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरेल. घरात आणि बाहेर सर्वांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा राहील. मोठी जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे. पत्रकारिता, लेखन आणि संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी आठवडा विशेष ठरेल. समाजात सन्मान मिळू शकतो. व्यवसायात विस्तार होईल आणि अपेक्षित नफा मिळेल. रोजच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होतील. बाजारात प्रतिष्ठा वाढेल. परदेशात जाण्याचा किंवा उच्च शिक्षणाचा प्रयत्न सफल होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात घरात धार्मिक किंवा शुभकार्य होईल. नातेवाईकांमधील गैरसमज संवादातून दूर होतील. आई-वडील आणि गुरूंचा आशीर्वाद मिळेल. अविवाहितांसाठी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते किंवा लग्न ठरू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.भाग्यवान रंग: सोनेरीभाग्यवान क्रमांक: 1









