advertisement

Nagpur Crime : सात महिनेही टिकला नाही संसार! हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेली अन् काळाने झडप घातली, गावावर दु:खाचा डोंगर

Last Updated:

Nagpur Accident News : अलिशा आणि मोनाली या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली.

tragedy struck Accident 2 womens Dies
tragedy struck Accident 2 womens Dies
Nagpur Crime News : नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा करुण अंत झाला आहे. महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोन तरुण महिलांना आपले प्राण गमवावे लागले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अलिशा आणि मोनाली या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघीही रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोनाली घाटोळे यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
advertisement

काळाने झडप घातली

अपघातातील मृत अलिशा मेहर या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी होत्या. अत्यंत दुःखद बाब म्हणजे, अलिशा यांचा विवाह केवळ 7 महिन्यांपूर्वीच झाला होता. संसाराची नवी स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. एका हसत्याखेळत्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे मेहर आणि घाटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement

लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते पण...

दुसरीकडे, मोनाली घाटोळे हिचा विवाह येत्या 26 फेब्रुवारीला निश्चित झाला होता. घरात लग्नाची लगबग सुरू होती, लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ही दुर्घटना घडली. ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता शोककळा पसरली आहे. लग्नापूर्वीच मुलीचा असा अंत झाल्याने नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Crime : सात महिनेही टिकला नाही संसार! हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेली अन् काळाने झडप घातली, गावावर दु:खाचा डोंगर
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement