advertisement

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू; 2 मित्रांचा पत्नीवरून वाद, मध्यस्थी करणं योगेशच्या जीवावर बेतलं, पुण्यात काय घडलं?

Last Updated:

दोघांनीही एकमेकांच्या पत्नीबद्दल अश्लील शिवीगाळ केली होती. हा वाद मिटवण्यासाठी ऋषिकेशने आपला मित्र योगेश धाकतोंडे याला सोबत घेतले आणि ते अमोलच्या येलवाडी येथील घरी गेले.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू (AI Image)
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू (AI Image)
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील येलवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोन मित्रांच्या वादात मध्यस्थी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. पत्नीवरून सुरू झालेल्या अश्लील शिवीगाळीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या योगेश धाकतोंडे या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी अमोल वाघ आणि त्याचा मित्र ऋषिकेश पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. दोघांनीही एकमेकांच्या पत्नीबद्दल अश्लील शिवीगाळ केली होती. हा वाद मिटवण्यासाठी ऋषिकेशने आपला मित्र योगेश धाकतोंडे याला सोबत घेतले आणि ते अमोलच्या येलवाडी येथील घरी गेले.
मध्यस्थी करताना घात झाला: चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. अमोल वाघ संतापला आणि त्याने ऋषिकेशवर हल्ला करण्यासाठी चाकू काढला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी योगेश मध्यस्थी करायला मध्ये पडला, मात्र अमोलने चाकू थेट योगेशच्या बरगडीत भोसकला. गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेनंतर पसार झालेल्या अमोल वाघला म्हाळुंगे पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, अमोलवर यापूर्वी मनमाडमध्येही गुन्हे दाखल आहेत. मृत योगेश केवळ मित्रासाठी मध्यस्थी करायला गेला आणि त्याचा बळी गेला.
पुण्यात पुन्हा हिट अँड रन 
दुसरीकडे, पुण्यातील पाषाण परिसरात पुन्हा एकदा 'हिट अँड रन'ची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला भरधाव कारने चिरडले असून, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू; 2 मित्रांचा पत्नीवरून वाद, मध्यस्थी करणं योगेशच्या जीवावर बेतलं, पुण्यात काय घडलं?
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement