बेन पोलीस स्टेशन हद्दीतील कौआकोल येथे राहणारा निरंजन कुमार बेनमध्येच क्लिनिक चालवयचा. दरम्यान, हिलसा येथील पेंदापूर गावातील एक महिलाही या दवाखान्यात काम करत होता, जिच्याशी डॉक्टरचे प्रेमसंबंध होते. हिल्सा येथील पेंदापूर गावात मंगळवारी रात्री डॉक्टर नर्सला नेण्यासाठी आला होता. इथे काही व्यक्तींनी नर्सच्या घरातच गोळ्या झाडून डॉक्टरची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
मैत्री, पैसा आणि गर्लफ्रेंड...फ्लॅटमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं उलगडलं गूढ
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बिहारशरीफ सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृत आरएमपी डॉक्टरची आई माया देवी यांनी सांगितलं की, वर्षा नावाच्या परिचारिकेशी त्याचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे घरात वाद सुरू होता. या संबंधानाही विरोध करूनही मुलाने ऐकलं नाही आणि नर्सला भेटणं सुरूच ठेवलं. याचाच परिणाम म्हणून त्याला जीव गमवावा लागला.
हत्येच्या या घटनेनंतर कुटुंबीयांनी 5 लाखांच्या व्यवहारावरून डॉक्टरचा वाद झाला असल्याचंही सांगितलं. यामुळे डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी नर्स वर्षासह तिचे वडील आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.