मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक खुलासे केले, जे ऐकून पोलीसही थक्क झाले. आरोपीने सांगितलं की, त्याने दारूच्या नशेत महिलेची हत्या तर केलीच पण तिच्यावर बलात्कारही केला.
ब्लॅकमेल करणाऱ्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप कसं करायचं? गुगल सर्च करून तरुणाचं भयानक कृत्य
advertisement
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी राजेश हा देहरादूनमध्ये सुलभ टॉयलेटचा कर्मचारी आहे. रविवारी रात्री रेल्वे स्थानकाजवळील एका दारूच्या दुकानात तो एका महिलेला भेटला. दोघांनी मिळून दारू प्यायली. यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीत एकत्र बसून दारू पिण्यासाठी घेऊन गेला. जिथे दोघे बसून दारू प्यायले.
यानंतर आरोपी राजेश याने मद्यधुंद अवस्थेत महिलेवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. विरोध करत महिलेनं त्याला चावा घेतला. यामुळे तो संतापला आणि त्याने महिलेचं डोके भिंतीवर तीन ते चार वेळा आदळलं. यानंतर तिच्या डोक्यावर लहान सिलेंडरने वार करून तिची हत्या केली आणि मग तिच्यावर बलात्कार केला.
सकाळी जेव्हा आरोपीचे डोळे उघडले आणि नशा उतरली तेव्हा त्याला ती महिला मृतावस्थेत पडल्याचं दिसलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने महिलेचा मृतदेह कचरापेटीत टाकून तिथून पळ काढला.