या प्लॅटफॉर्मवर काही लोक मनोरंजनासाठी कंटेंट बनवतात, तर काहींचा उपयोग चुकीच्या उद्देशासाठी होतो. अशाच एका घटनेमध्ये, कोलकाता पोलिसांनी एक यूट्यूबर आणि त्याचा अल्पवयीन मुलाला, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपा खाली अटक केली आहे.
ही घटना पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्याच्या बसीरहाट तालुक्यातील हरोआ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली. पीडित मुलीचे वडील कोलकाता पोलिस विभागात अधिकारी आहेत.
advertisement
पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी यूट्यूबर अरबिंद मंडल आणि त्याचा अल्पवयीन मुलगा काही महिन्यांपूर्वी या मुलीला सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्स तयार करण्याच्या नावाखाली बोलावले होते. त्यांनी मुलीला विविध ठिकाणी नेऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्याचा बहाणा केला.
सदर यूट्यूबर आणि त्यांच्या मुलाने पीडित मुलीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय घेतले. नंतर त्यांनी ह्या फोटो आणि व्हिडिओंचा वापर करून मुलीला ब्लॅकमेल केलं. “जर कोणालाही काही सांगितलं तर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतील,” अशी धमकी त्यांनी दिली.
पीडित मुलगी घाबरून काही महिने शांत राहिली. परंतु पैसे न दिल्यामुळे आरोपी यूट्यूबर आणि त्याच्या मुलाने मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. शुक्रवारी मुलीने संपूर्ण प्रकरण कुटुंबाला सांगितले. कुटुंबाने हरोआ पोलीस ठाण्यात आरोपी यूट्यूबर आणि त्याच्या मुलावर तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी अरबिंद मंडल आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आणि त्यांना बसीरहाट उपविभागीय न्यायालयात हजर केले.
पोलीस सध्या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आरोपींविरोधात योग्य कायदेशीर कारवाई सुरू आहे.