TRENDING:

'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली

Last Updated:

सावत्र आईवर वाईट नजर टाकल्यामुळे बापाने आपल्याच मुलाची गळा घोटून हत्या केली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर बापाने मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये टाकला आणि नदीमध्ये फेकून दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सावत्र आईवर वाईट नजर टाकल्यामुळे बापाने आपल्याच मुलाची गळा घोटून हत्या केली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर बापाने मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये टाकला आणि नदीमध्ये फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला 3 दिवसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर बापाने मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मुलाची माझ्या पत्नीवर वाईट नजर होती, तू माझी नाहीस, पत्नीसारखी आहेस, असं तो तिला म्हणायचा. यावरूनच मला राग आला आणि मी माझ्याच गमछाने त्याचा गळा घोटला, असं बापाने पोलिसांना सांगितलं आहे.
'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली
'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली
advertisement

दुसरीकडे मुलाच्या सावत्र आईनेही पोलिसांना जबाब दिला आहे. 'माझा पती दिल्लीमध्ये नोकरी करायचा आणि मी मुलासोबत गावामध्ये राहायचे. तो माझ्याकडे किस मागायचा आणि माझ्यासोबत चुकीची वर्तणुक करायचा', असं महिलने पोलिसांना सांगितलं आहे.

ही घटना नालंदाच्या हरनौथ भागामध्ये मुढारी गावात झाली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव पिंटू कुमार असून तो 23 वर्षांचा होता. तर आरोपी वडिलांचं नाव श्याम राम आहे. 10 ऑगस्टच्या रात्री श्याम रामने मुलगा पिंटू कुमारची गळा घोटून हत्या केली आणि मृतदेह गंगा नदीमध्ये फेकला.

advertisement

'माझ्या नवऱ्याची 3 लग्न झाली आहेत. मी त्याची तिसरी पत्नी आहे. पिंटू त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. पिंटू माझ्यासोबत अनेकदा वाईट गोष्टी बोलायचा. मी त्याला समजवायचे, पण तो ऐकायचा नाही. 10 ऑगस्टला पतीसमोरही त्याने असंच केलं, यावर माझ्या पतीने आक्षेप घेतला, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि पतीने गमछाने त्याचा गळा दाबला', असं श्याम रामच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं.

advertisement

ऍम्ब्युलन्सने मृतदेह गंगेत टाकला

पिंटूची हत्या केल्यानंतर श्याम रामने त्याचा मोठा भाऊ शैलेंद्र राम आणि मित्र दीना साव यांच्या मदतीने एक ऍम्ब्युलन्स मागवली. 10 ऑगस्टच्या रात्री त्याने मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळला आणि ऍम्ब्युलन्समध्ये टाकला. यानंतर श्याम राम ऍम्ब्युलन्स पटणा जिल्ह्यातील सबनीमा गावात घेऊन गेला आणि मृतदेह गंगा नदीत फेकला. यामध्ये श्याम रामच्या काकानेही त्याची मदत केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

श्याम राम याने 3 लग्न केली आहे. पिंटू श्याम रामच्या पहिल्या पत्नीपासून झाला. 1999 साली श्याम रामने पहिलं लग्न केलं त्यानंतर पिंटूचा जन्म झाला. पण 2012 साली पहिल्या पत्नीने स्वत:ला पेटवून घेतलं आणि आयुष्य संपवलं. यानंतर 2012 साली श्याम रामने दुसरं लग्न केलं, पण 2 वर्षांनंतर त्याची दुसरी पत्नीही निघून गेली. यानंतर 2014 साली श्याम रामने तिसरं लग्न नीलू देवीसोबत केलं. नीलू आणि श्याम यांना 2 मुलंही झाली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल