TRENDING:

APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्ष खातायत चांगलाच भाव, कांद्याची काय स्थिती?

Last Updated:

आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आज शेतमालाची आवक झाली. बुधवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहू.
advertisement

कांद्याची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 69 हजार 887 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 19 हजार 140 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 314 ते 1174 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2280 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Weather Alert : महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढाच, गुरुवारी सूर्य आग ओकणार, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

advertisement

लिंबूची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 1103 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 409 क्विंटल लिंबूला 600 ते 3300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल लिंबूला 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1258 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 886 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 156 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 80 क्विंटल केळीला प्रतीनुसार 800 ते 1700 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्ष खातायत चांगलाच भाव, कांद्याची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल