TRENDING:

telegram-whatsapp च्या माध्यमातून लावला अनेकांना चूना, Online Gaming मधून गावातील मुलांचं कांड

Last Updated:

आरोपींनी टेलिग्राम आणि व्हाट्सअपवर ग्रुप बनवले होते. यामध्ये अडीच लाख लोक होते. हे सर्वजण गेमच्या नावावर चुकीचे किंवा दुसऱ्या लोकांचे अकाऊंटचा आयडी क्रिएट करत होते आणि त्यांच्यासोबत गेम खेळायचे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन प्रकाश, प्रतिनिधी
अटक केलेले आरोपी
अटक केलेले आरोपी
advertisement

सुपौल : सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. अनेकांना गेम खेळण्याची आवड आहे. आवड नव्हे तर काही जणांना याचे व्यसनही आहे. यातच आता तुम्हीही जर ऑनलाइन गेम खेळत असाल तर सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा जास्त पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या आयुष्यातील कमावलेली रक्कमही तुम्ही गमावू शकतात. सायबर गुन्हेगार अशा पद्धतीने तुमची लूट करून तुम्हाला कंगाल करू शकतात.

advertisement

असाच एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एकाच गावातील काही मुले महादेव बुकींग अॅप चालवत होते. या माध्यमातून ते अडीच लाख लोकांचा टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप तयार करुन गेम खेळायचे आणि वेळ मिळताच मोठी गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचे बँक खाते साफ करायचे. पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई करत तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

advertisement

बिहारच्या सिहरसा जिल्ह्यात ही घटना समोर आली. पोलिसांनी काशनगरच्या मौरा चोक येथून या आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून 4 मोबाइल, 2 एटीएम, 3 पासबुक, 3 चार चाकी वाहन, 5 सिमकार्ड आणि एक वायफाय राऊटरही जप्त करण्यात आले आहे.

नैराश्य, मानसिक तणाव दूर करायचा असेल तर हे फळ नक्की खा, खेळाडूंची आहे पहिली पसंत

advertisement

अशी झाली अटक -

याबाबत साइबर डीएसपी अजीत कुमार यांनी सांगितले की, सोनवर्षा राज पोलीस ठाणे हद्दीतील काशनगर ओपी अंतर्गत वाहन चेकिंग केली जात होती. यादरम्यान, एक चारचाकी वाहन संशयास्पद वाटले त्यामुळे या वाहनाला थांबविण्यात आले. मात्र, पोलिसांना पाहताच कारमधील एक गुन्हेगार पळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. यानंतर कारमधील इतर तीन मुलांना अटक करण्यात आली. रविराज उर्फ दिलखुश मेहता, माणिकचंद कुमार आणि पंकज कुमार अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.

advertisement

पोलीस तपासात त्यांनी धक्कादायक माहिती दिली. पोलीस तपासात ही सर्व मुले सायबर गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, हे सर्वजण महादेव बुक गेमिंग अॅप चालवतात. तीनही आरोपी हे बसनही पोलीस ठाणे हद्दीतील जमुनिया गावातील रहिवासी आहेत. यामध्ये रविराज हा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याआधी त्याला अटक करण्यात आली होती.

अशाप्रकारे लावायचे लोकांना चूना -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

डीएसपी यांनी सांगितले की, आरोपींनी टेलिग्राम आणि व्हाट्सअपवर ग्रुप बनवले होते. यामध्ये अडीच लाख लोक होते. हे सर्वजण गेमच्या नावावर चुकीचे किंवा दुसऱ्या लोकांचे अकाऊंटचा आयडी क्रिएट करत होते आणि त्यांच्यासोबत गेम खेळायचे. सुरुवातीला ते जिंकत असल्याचे दाखवून त्यांना काही पैसेही द्यायचे. पण जेव्हा लोक जास्त पैसे गुंतवायचे, तेव्हा हे सर्वजण त्या समोरच्या व्यक्तीची मोठी आर्थिक फसवणूक करायचे आणि अशाप्रकारे ते सर्व निरपराध लोकांना अडकवून त्यांची लूट करायचे, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
telegram-whatsapp च्या माध्यमातून लावला अनेकांना चूना, Online Gaming मधून गावातील मुलांचं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल