TRENDING:

धक्कादायक! लोखंडी रॉडने गळ्यावर वार, रिमोटसाठी मित्राच्या मुलीचा घेतला जीव

Last Updated:

दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये रिमोटच्या वादातून रंजीत सिंगने मित्राच्या सात वर्षीय मुलीची हत्या केली. आरोपीला अटक झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रिमोटवरुन भांडण होतात, पण त्या भांडणाचं रुपांतर जीवघेणं होईल याची कल्पनाही केली नसेल. अशीच एक हृदय हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या वादातून हत्या करण्यात आली आहे. मित्राच्या मुलीचा जीव घेतल्याचा अमानुष प्रकार समरो आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका सात वर्षीय चिमुकलीची रिमोटच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली.
News18
News18
advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, हा अमानुष प्रकार पीडितेच्या वडिलांच्या मित्रानेच केला आहे. केवळ टीव्हीच्या रिमोटवरून झालेल्या वादातून त्याने तिचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आरोपीचा शोध घेतल्यानंतर ३५ वर्षीय रंजीत सिंग याला नरेला औद्योगिक क्षेत्रातून अटक करण्यात आली. रंजीत मूळचा बिहारचा असून स्वरूप नगरमधील भट्टा रोड परिसरात रहिवासी आहे. तो एका कारखान्यात मजुरी करायचा. पोलीस तपासात समोर आले की, रंजीत पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता आणि तो त्यांच्या घरी वारंवार येत असे.

advertisement

Pune : नवरा आवडला नाही तरी घातला 'प्री-वेडिंग'चा घाट, कॅमेरासमोर हसली, पण मनात शिजत होता हत्येचा कट

नेमकं काय घडलं?

रविवारी जे-ब्लॉक, खड्डा कॉलनी येथे लोकांची मोठी गर्दी जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, एका घरात जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात चिमुकलीचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचाराचा कोणताही पुरावा सापडला नसला तरी शवविच्छेदन अहवालात नेमकं काय येतं याची प्रतीक्षा आहे.

advertisement

एकाच रिमोटमुळे मुलीचा गळा आवळला!

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रंजीत आणि मुलीच्या वडिलांनी एकत्र बसून दारू प्यायली. नंतर रंजीत घरी परतला, पण काही वेळाने तो परत आला आणि टीव्ही पाहू लागला. त्याच वेळी, पीडित मुलगी तिच्या वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत होती. दरम्यान, तिने टीव्हीचा रिमोट घेऊन त्याला त्रास दिला. यावरून संतापलेल्या रंजीतने मुलीला मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली आणि तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले.

advertisement

गुन्हा लपवण्यासाठी निर्दयी कृत्य

आरोपी रंजीत केवळ एवढ्यावरच थांबण्याऐवजी लोखंडी रॉडने तिच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घाबरलेल्या रंजीतने तिचा मृतदेह कपड्यांमध्ये गुंडाळून बिछान्याच्या खाली लपवला आणि पीडितेच्या वडिलांचा मोबाईल घेऊन पसार झाला.

Akola : 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराचे आरोप, अकोल्याच्या TC ने मालगाडीसमोर उडी मारून आयुष्य संपवलं

advertisement

पोलिसांनी आरोपीला पकडले

ही धक्कादायक घटना राजधानी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागातील स्वरूप नगरमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान, नरेला औद्योगिक क्षेत्रातून आरोपी रंजीत सिंगला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात एका निष्पाप चिमुकलीवर एवढा क्रूर हल्ला होणे, हे समाजमन सुन्न करणारे आहे. मित्राच्या घरात येणारा विश्वासू वाटणारा व्यक्तीही कधी भक्षक बनू शकतो, हे या घटनेने स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे दिल्ली हादरली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक! लोखंडी रॉडने गळ्यावर वार, रिमोटसाठी मित्राच्या मुलीचा घेतला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल