मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी केशवचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली. कुटुंबीय संध्याकाळी परत आले असता त्यांना खोली आतून बंद असल्याचं आढळलं. अनेकदा प्रयत्न करूनही दरवाजा उघडला गेला नाही. त्याने फोनही उचलले नाहीत. अखेरीस त्यांनी खिडकीतून आत डोकावलं असता गळफास घेतलेल्या अवस्थेत केशव दिसला. त्याचा मोबाइल जवळच पडलेला होता. धक्कादायक म्हणजे त्याच्या फोनवर त्याच्या प्रेयसीचे तब्बल 30 मिस्ड कॉल्स आलेले होते.
advertisement
पोलिसांच्या तपासात असं निदर्शनास आलं, की केशव अनेक दिवसांपासून त्याच्या मैत्रिणीच्या ब्लॅकमेलिंगपासून मुक्त होण्यासाठी गुगल आणि यू-ट्यूबवर मार्ग शोधत होता. त्याने वकील आणि तांत्रिकांचे सल्लेही शोधले होते, यासाठी त्यानं त्याच्या मित्रांचीही मदत घेतली होती.
केशवचा शाळेतला मित्र गौरव याने माध्यमांना सांगितलं की, केशव साधा-सरळ मुलगा होता. तो त्याच्याशी सुख आणि दु:खाच्या गोष्टी शेअर करत असे. पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केशव त्याच्या प्रेयसीला भेटला होता. त्यांची मैत्री कालांतरानं अधिक घट्ट होत गेली; पण ती केशवला नियंत्रणात ठेवू इच्छित होती. तिला केशवचा मित्रांसोबतचा संवाद आवडत नव्हता. तिच्यासाठी केशव आपल्या मित्रांपासून दूर गेला. गौरवने असंही सांगितलं, की केशव तिच्या स्वभावाला कंटाळला होता आणि त्याला तिच्यापासून वेगळं व्हायचं होतं.
केशवच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रेयसी त्याच्याशी सतत भांडत असे. त्यामुळे त्यानं तिचा नंबर ‘लडाकू विमान’ या नावाने सेव्ह केला होता. पोलिसांनी केशवचा मोबाइल तपासला असता, त्याने गळफास घेण्यापूर्वी तीन वेळा ‘लडाकू विमान’ या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल आला होता.
केशवचे वडील रोशन लाल यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला त्याची प्रेयसी कारणीभूत असल्याचा आरोप केला. ती हे थांबवू शकली असती, असं ते म्हणाले. त्यांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
केशवच्या प्रेयसीने मात्र त्याच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्याच्या मृत्यूबद्दल तिनं दु:ख व्यक्त केलं आणि दावा केला की, तो आर्थिक समस्यांमुळे त्रस्त होता. तिने ठामपणे सांगितलं, की केशवने पैशांशी संबंधित तणावाबद्दल तिला सांगितलं होतं. अनेक कॉल करूनही त्याला कामासाठी पैशांची मदत मिळाली नव्हती.
केशवचे मित्र आणि वडील मात्र आपल्या मतांवर ठाम आहेत. प्रेयसीचं ब्लॅकमेलिंग आणि नियंत्रणाला कंटाळूनच त्यानं आत्महत्या केली, असा त्यांचा आरोप आहे. राकेश नावाच्या मित्राने संभाषणाचे स्क्रीनशॉट्सही दाखवले आहेत. त्यात केशवने असं लिहिलं होतं, की तो फार त्रस्त होता. काहीही करून त्याला या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत हवी होती. नाही तर आत्महत्येचं पाऊल उचलावं लागेल, असंही त्याने लिहिलं होतं.