नाश्त्याला कधीपर्यंत तेच तेच पदार्थ खाणार, बनवा पनीर–बेसन चिला, सोप्या रेसिपीचा Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हा पदार्थ कमी वेळात तयार होतो आणि साहित्यही सहज उपलब्ध असते आणि बनवण्याची पद्धतही सोपी आहे.
मुंबई : धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत प्रत्येकाला दिवसाची सुरुवात उत्साहाने करायची असते. मात्र, सकाळच्या गडबडीत पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता तयार करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. त्यामुळे असा नाश्ता हवा असतो जो पटकन तयार होईल, पोटभर असेल आणि शरीराला आवश्यक पोषणमूल्येही देईल. अशा परिस्थितीत पनीर-बेसन चिला हा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय म्हणून पुढे येतो. हा पदार्थ कमी वेळात तयार होतो आणि साहित्यही सहज उपलब्ध असते आणि बनवण्याची पद्धतही सोपी आहे. पनीरमुळे या चिल्यात भरपूर प्रथिने मिळतात तर बेसन ऊर्जा देणारे आणि पचायला हलके असते. त्यामुळे हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य ठरतो.
पनीर–बेसन चिला साहित्य
1 कप बेसन
2 चमचे तांदळाचे पीठ
½ कप किसलेले पनीर
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
2 टेबलस्पून कोथिंबीर
¼ टीस्पून हळद
½ टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
पाणी (पीठ बनवण्यासाठी)
तेल/तूप भाजण्यासाठी
advertisement
पनीर–बेसन चिला कृती
एका भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात हळद, तिखट आणि मीठ घाला. थोडं थोडं पाणी घालून गाठी न राहता पातळसर पीठ तयार करा. आता त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून नीट मिसळा. तवा गरम करा आणि थोडं तेल लावा. तयार पीठ तव्यावर घालून गोल पसरवा. त्यावर पनीर किसून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. गरमागरम चिला चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
advertisement
टिप: पीठ खूप घट्ट नको आणि खूप पातळही नको - डोश्याच्या पिठासारखं असावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 3:53 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
नाश्त्याला कधीपर्यंत तेच तेच पदार्थ खाणार, बनवा पनीर–बेसन चिला, सोप्या रेसिपीचा Video








