advertisement

ट्रॅक्टर-रिक्षाचा भीषण अपघात, पाईप थेट रिक्षात आरपार घुसला, ५ जण गंभीर जखमी, थरकाप उडवणारा CCTV

Last Updated:

शिरपूर वाघाडी रस्त्यावरील 'वाघाडी टी पॉइंट' जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बोअरवेल ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली.

धुळे अपघात
धुळे अपघात
दिपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी रस्त्यावर बोअरवेल ट्रॅक्टर आणि ॲपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

बोअरवेल ट्रॅक्टरवर ठेवलेला बोरवेलचा पाईप थेट रिक्षामध्ये आरपार घुसला

शिरपूर वाघाडी रस्त्यावरील 'वाघाडी टी पॉइंट' जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बोअरवेल ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोअरवेल ट्रॅक्टरवर ठेवलेला बोरवेलचा पाईप थेट रिक्षामध्ये आरपार घुसला.

ॲपे रिक्षाचा अक्षरशः चुराडा, महिला रस्त्यावर फेकली गेली, पाच जण गंभीर जखमी

advertisement
या भीषण दुर्घटनेत ॲपे रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून रिक्षामधील महिला रस्त्यावर फेकली गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. या भीषण अपघातात ॲपे रिक्षामध्ये प्रवास करणारे चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

जखमी उपचारासाठी रुग्णालयात, पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल

दरम्यान घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे बोअरवेल ट्रॅक्टरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
ट्रॅक्टर-रिक्षाचा भीषण अपघात, पाईप थेट रिक्षात आरपार घुसला, ५ जण गंभीर जखमी, थरकाप उडवणारा CCTV
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement