advertisement

'PIR.BG...', सोशल मीडियावर हिंट देत प्रसिद्ध K-Drama स्टारचा मृत्यू, काय आहे या शब्दाचा अर्थ?

Last Updated:
Jung Eun-woo Death: जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या K-Drama चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.
1/8
जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या K-Drama चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.
जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या K-Drama चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/8
'ब्राइड ऑफ द सन' आणि 'वेलकम टू वायकीकी' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेला देखणा दक्षिण कोरियन अभिनेता जंग युन-वू (Jung Eun-woo) याचे ११ फेब्रुवारी रोजी अचानक निधन झाले.

3/8
३९ वर्षीय जंगच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मात्र, त्याच्या निधनापेक्षाही त्याने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही क्रिप्टिक पोस्ट्सने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

4/8
जंगच्या निधनानंतर चाहत्यांचे लक्ष त्याच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टकडे गेले आहे, जी त्याने मृत्यूच्या अवघ्या एक दिवस आधी शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने स्वतःच्या फोटोंसोबत हाँगकाँगचे दिग्गज अभिनेते लेस्ली च्युंग आणि ब्रिटीश गायिका एमी वाइनहाऊस यांचे फोटोही शेअर केले होते. विशेष म्हणजे, या दोन्ही स्टार्सचा मृत्यू त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना झाला होता.

5/8
या पोस्टला त्याने कॅप्शन दिले होते,
या पोस्टला त्याने कॅप्शन दिले होते, "आठवण येतेय, हेवा वाटतोय, खंत वाटतेय... PIR.BG." सुरुवातीला या 'PIR.BG' शब्दाचा अर्थ कोणालाच कळला नाही. मात्र, सोशल मीडिया युजर्सनी जेव्हा हे अक्षर उलटे करून पाहिले, तेव्हा त्याचा अर्थ 'GB.RIP' (Goodbye, Rest In Peace) असा होत असल्याचे समोर आले. एका चाहत्याने भावूक होऊन कमेंट केली की, "तो आपल्याला इशारा देत होता, पण आपणच ते ओळखू शकलो नाही."
advertisement
6/8
इतकंच नाही तर, काही काळापूर्वी त्याने रेड मूनचा फोटो शेअर करत लिहिले होते,
इतकंच नाही तर, काही काळापूर्वी त्याने रेड मूनचा फोटो शेअर करत लिहिले होते, "लाल चंद्र. लटकलेला असो वा लटकवलेला... शेवटी तो पडणारच आहे." या अशा गूढ ओळींमुळे जंगला आपल्या अंताची चाहूल लागली होती का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी वैयक्तिक गोपनीयतेचा हवाला देत मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
advertisement
7/8
१० एप्रिल १९८६ रोजी इंचेऑनमध्ये जन्मलेल्या जंगचं खरं नाव 'जंग डोंग-जिन' होतं. शालेय जीवनात तो एक उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होता, पण एका दुखापतीमुळे त्याचं खेळाचं स्वप्न भंगलं. त्यानंतर त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

8/8
अभिनयाचं कोणतंही रीतसर शिक्षण न घेता, त्याने थेट सेटवर जाऊन काम शिकायला सुरुवात केली. २००६ मध्ये 'Rounding Off Season 3' मधून त्याने पदार्पण केलं आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement