26 मे 2024 रोजी कृतिकाचं महेंद्र सोबत लग्न झालं होतं. दोघेही डॉक्टर असल्यानं त्यांचं लग्न चांगलंच गाजलं होतं. दृष्ट लागण्याजोगा त्यांचा संसार झाला होता. आणि खरोखरच त्यांच्या संसाराला इतर कुणाची नव्हे तर कृतिकाचा पती महेंद्रचीच नजर लागली. कृतिका काही आजारानं त्रस्त होत्या. त्यांच्यावर महेंद्र उपचार करत होता. मात्र सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात महेंद्रनं मोठा कट रचला.
advertisement
पोस्टमॉर्टमनं सत्य समोर
डॉ. महेंद्र याने कृतिकाला प्रोपोफोल नावाचे शक्तिशाली एनेस्थेटिक औषध देऊन हत्या केली. नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी पूर्ण कट रचला होता. मात्र पोस्टमॉर्टमनं सत्य समोर आणलं. पोस्टमॉर्टम अहवालात कृतिकाच्या शरीरात एनेस्थेसिया आढळून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्रला अटक केली. लग्नानंतर काही दिवसात महेंद्रला कळले की कृतिका अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांशी झुंजत आहे. मात्र कृतिकाच्या कुटुंबीयांनी ही माहिती लपवली होती
तपासात धक्कादायक सत्याचा पर्दाफाश
याच कारणाने महेंद्र रेड्डीने कृतिकाचा जीव घेतला. चौकशीत हे ही समोर आलं की, डॉ. महेंद्र याने या आधीही काही गुन्हे केले आहेत. त्याच्यावर फसवणूक आणि धमकी देण्यासारखे अनेक गुन्हे आधीपासून नोंदवलेले आहेत. आता पोलिसांनी या केसमध्ये हत्येच्या कलमांचाही समावेश केला. डॉक्टर कृतिकाच्या वडिलांच्या सांगण्यावरून या केसची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली होती. तपासात धक्कादायक सत्याचा पर्दाफाश झाला.
माझ्या लेकीनं पतीवर विश्वास ठेवला, पण त्यानं....
कृतिकाची बहीण डॉक्टर निकिता रेड्डीनं हत्येचा संशय व्यक्त करत पोलीस तक्रार दाखल केली होती. तो संशय खरा ठरला. महेंद्र रेड्डीनं कृतिकाची अतिशय थंड डोक्यानं हत्या केली. तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवलं.आरोपीच्या कुटुंबावर अनेक गुन्हे आहेत. मात्र लग्न करताना त्यांनी ही बाब लपवली होती. माझ्या लेकीनं पतीवर विश्वास ठेवला, पण त्यानं विश्वासघात केला, अशा भावना कृतिकाच्या वडिलांनी व्यक्त केल्या. महेंद्र रेड्डीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कृतिकाच्या कुटुंबानं केली आहे.