नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच 01.01.2025 रोजी, दिल्लीच्या नांगलोई भागात राहणारी ज्योती, जी किट्टू नावानेही ओळखली जाते, आपल्या पतीसोबत घरात होती. आरोप आहे की, ज्योतीने पतीच्या चेहऱ्यावर, तोंडावर आणि छातीवर उकळत्या पाण्यात लाल मिरची पूड मिसळून टाकली. इतकंच नाही, तर ज्योतीने तिच्या पतीला कथितरित्या म्हटलं, 'मला तुला मारायचं आहे.' हे ऐकून पतीला धक्काच बसला.
advertisement
फोन घेऊन पळून गेली...
या घटनेनंतर ज्योतीने आणखी एक धोकादायक पाऊल उचललं. तिने रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि पतीचा मोबाईल फोन घेऊन पळ काढला, जेणेकरून तो कोणाचीही मदत मागू शकणार नाही. वेदनेने कळवळत असलेल्या पतीने नंतर खिडकी तोडली आणि बाल्कनीमध्ये पोहोचून मदतीसाठी मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरमालक विकास तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं की, पतीला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
ज्योतीच्या दुसऱ्या लग्नानंतरच्या घटनेने...
ज्योतीविरुद्ध नांगलोई पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच आरोपपत्र दाखल केलं. हे प्रकरण तीस हजारी कोर्टात पोहोचलं, जिथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश (ASJ) सौरभ कुलश्रेष्ठ यांनी त्याची सुनावणी केली. ज्योतीच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला की, ज्योतीला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, ज्योती स्वतः तिच्या पतीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराची शिकार आहे.
19 नोव्हेंबर 2024 रोजी ज्योतीने तिच्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. वकिलाने हेही सांगितलं की, ज्योतीचं आयुष्य सोपं नव्हतं. तिचं पहिलं लग्न मोडलं होतं आणि तिला एक मुलगीही आहे. दुसरीकडे, पतीच्या वकिलाने जामीनाला विरोध करत सांगितलं की, ज्योतीने तिच्या पहिल्या लग्नाची आणि मुलीची माहिती पतीपासून लपवली होती, जो त्यांच्या नात्यातील एक मोठा विश्वासघात होता. पतीच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, ज्योतीचं वागणं धोकादायक आहे आणि तिला जामीन दिल्यास पीडित आणि साक्षीदारांना धोका निर्माण होऊ शकतो.
अखेर जामीन मंजूर
9 जुलै 2025 रोजी कोर्टाने ज्योतीला 30000 रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला. होय, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने ज्योतीला जामीन देण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी सांगितलं की, प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन आणि ज्योती पीडित किंवा साक्षीदारांना कोणतंही नुकसान पोहोचवणार नाही याची खात्री करून तिला जामीन दिला जाऊ शकतो. कोर्टाने कठोर अटी घातल्या जेणेकरून कोणतीही गैरव्यवहार होणार नाही.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडकडून धोका, स्टेटस ठेवलं; एक्स बॉयफ्रेंडला लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण
हे ही वाचा : नवदाम्पत्य बघायला गेले सिनेमा, नवरा करू लागला विचित्र हालचाली; ते पाहून नवरी किंचाळली आणि...