गर्लफ्रेंडकडून धोका, स्टेटस ठेवलं; एक्स बॉयफ्रेंडला लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तुळजापूर तालुक्यात सांगवी मार्डी येथील योगेश कोळे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : प्रेमात धोका दिल्याचं मोबाईलवर स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे घडली आहे. पोलिसांनी तीन आरोपी विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीचे गुंड गजा मारणेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
तुळजापूर तालुक्यात सांगवी मार्डी येथील योगेश कोळे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. गावातील रोहित बागल, काक्रबा येथील चेतन माने, तुळजापूर सत्यवान चादरे या 3 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम140(3),118(1),352,351(1),3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरु आहे
advertisement
तरुणाला जबर मारहाण
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, योगेश काळे हिचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यांचा साखरपुडा देखील झाला होता मात्र तिने प्रेमात धोका दिल्याने योगेशने मोबाईलवर स्टेट्स ठेवले. त्याचा राग तरुणाला आला त्यानंतर ते योगेशच्या घरी आले व स्टेट्स का ठेवले म्हणुन शिवीगाळ केली व कट रचून त्याचे गाडीत बसवून अपहरण करत जबर मारहाण केली. तरुणाच्या डोळ्यावर, तोंडावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर धाराशिव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
advertisement
आरोपीचे गजा मारणेशी संबंध
दरम्यान या पीडित मुलाला धोका देऊन ज्या मुलासोबत मुलीने विवाह केला त्याचे फोटो गुंड गजा मारणे सोबत आहेत. आरोपीचे गुंडाशी संबंध असून माझ्या जीवितला धोका असल्याचं तरुणाचं म्हणणं आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गर्लफ्रेंडकडून धोका, स्टेटस ठेवलं; एक्स बॉयफ्रेंडला लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण