Ketu Gochar 2026: थेट मार्चपर्यंतचे टेन्शन मिटले; केतुची चाल 4 राशीच्या लोकांना भाग्याची, नॉनस्टॉप पैसा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा दिवस खास आहे. 25 जानेवारी 2026 च्या सकाळपासून केतू ग्रहाने आता पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश केला आहे. हा केवळ एक खगोलीय बदल नसून नशिबाला अचानक कलाटणी देणारा एक महत्त्वाचा योग आहे. ज्योतिषशास्त्रात केतू हा विरक्ती आणि पूर्वकर्मांचा प्रतिनिधी मानला जातो, तो आपल्याला नवीन मार्ग दाखवतो.
केतू हा शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र हा सुख, प्रेम आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. केतूसारखी आध्यात्मिक शक्ती शुक्राच्या क्षेत्रात येते, तेव्हा केवळ त्यागच नाही तर काही वेळा इच्छापूर्तीचे फळही मिळते. पहिल्या चरणातील या प्रवेशामुळे याचा प्रभाव खूप वेगवान आणि अचानक जाणवेल, जणू नशिबाचे दरवाजे आपोआप उघडले आहेत असे वाटेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे प्रेम आणि आकर्षणाशी संबंधित असल्यानं केतूचा हा प्रवास नात्यांमधील सत्य समोर आणेल. जे संबंध कर्मिक आहेत ते अधिक घट्ट होतील आणि जे नाते केवळ ओझे बनले आहे त्यातून सुटका मिळू शकेल. हा काळ त्यांच्यासाठीच फलदायी ठरेल जे लोभ सोडून स्पष्टतेने आणि सत्याने निर्णय घेतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






