या प्रकरणात भोंदू बाबाही सामील
सविस्तर वृत्त असे की, पीडित महिला ही सावंतवाडीतील आहे. 2019 पासून रामनगर शिये येथे भाड्याने राहत आहे. घरमालकाचा मुलगा गैबीसाब यांनी मागील 7 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. आरोपीचे लग्न झालेले आहे, त्याला 2 मुले आहेत. तरीही लग्नाचे आमिष दाखवलं आणि अत्याचार केले. या प्रकरणात गैबीसाब दस्तगीर लेंगरे (वय-35) आणि बेबीजान दस्तगीर लेंगरे (वय-50, रा. रामनगर शिये) आणि एका अज्ञात भोंदूबाबा यांच्या विरोधात पीडित महिलेने शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
advertisement
जीवे मारण्याची दिली होती धमकी
त्याचबरोबर या प्रकरणात आरोपीने एका भोंदूबाबाकडून पीडितेच्या गळ्यात ताईत, लिंबू आणि गंडादोरा बांधण्यासाठी दिला होता. "हा ताईत टाकू नको आणि कुणाला सांगू नको, नाहीतर तुला मारून टाकेन", अशी धमकी गैबीसाब लेंगरे याने पीडित महिलेला दिली होती. ज्यावेळी पीडितेला गैबीसाबचे लग्न झाले आहे आणि त्याला 2 मुले आहे हे समजले, तेव्हा आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आले. पीडित महिलेने शिरोली पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधांत फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केलेला आहे.
हे ही वाचा : लग्नाचं स्वप्न पडलं महागात! 'त्या' तरुणीने लावला 6 लाखांना चुना; म्हणाली होती, "आपण लग्न करू आणि..."
हे ही वाचा : Cyber Crime: 'ती' फाइल आली अन् क्लिक केली; सायबर चोरट्यांचा 7 लाखांवर डल्ला, सांगलीतील दोघांना 'असं' लुटलं!