Cyber Crime: 'ती' फाइल आली अन् क्लिक केली; सायबर चोरट्यांचा 7 लाखांवर डल्ला, सांगलीतील दोघांना 'असं' लुटलं!

Last Updated:

Sangali News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. झरे आणि विभूतीवाडी या गावातील दोघांच्या बँक खात्यातून...

Cyber Crime
Cyber Crime
Sangali News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. झरे आणि विभूतीवाडी या गावातील दोघांच्या बँक खात्यातून 7 लाख 25 हजार गायब झाले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
एकाच परिसरात घडल्या 3 घटना
सविस्तर माहिती अशी की, या परिसरात मागील काही दिवसांपासून नागरिकांना मोबाईलवर 'पीएम किसान योजना' नावाची फाइल पाठवली जात आहे, त्याद्वारे लोकांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारला जातोय. यासंदर्भात 3 घटना समोर आलेल्या आहेत.
दोघांनी एकाच पद्धतीने झाली फसवणूक
झरे गावातील रोहित संजय सुतार यांच्या मोबाईलवर एक फाइल आली, त्यांनी लगेच ओपन केली. तर झटक्यात त्यांच्या बँक खात्यातून 94 हजार रुपये गायब झाले. हे पैसे काढल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरही आला. दुसऱ्या घटनेत विभूतीवाडीतील पोपट खर्जे (जे सध्या पुण्यात नोकरीनिमित्त असतात) त्यांच्याही मोबाईलवर अशी एक फाइल आली, त्यांनीही त्यावर क्लिक केली, तर त्यांच्या खात्यातून तब्बल 6 लाख 31 हजार गायब झाल्याची घटना घडली.
advertisement
परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली
आठ दिवसांपूर्वी झरे येथे अशाचप्रकारे एका बँक खातेदाराचे 12700 रुपये गायब झाल्याची घटना घटली होती. या पैसे गायब होण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित फसवणूक झालेल्या व्यक्तींनी बँकेला आणि पुणे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केलेली आहे. पोलीस तपास करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Cyber Crime: 'ती' फाइल आली अन् क्लिक केली; सायबर चोरट्यांचा 7 लाखांवर डल्ला, सांगलीतील दोघांना 'असं' लुटलं!
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement