Vasai Virar Election 2026 : मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना वसई विरारमध्ये चिन्हावरून वाद, कमळ, धनुष्यबाणावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

Last Updated:

वसई विरार महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप झाला होता.ईव्हीएममध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दर्शनवणाऱ्या कागदावर काही विशिष्ट पक्षांची कमळ, धनुष्यबाण ही चिन्हे ठळकपणे दिसत होती तर इतर पक्षाची चिन्हे पुसट झाल्याचा आरोप झाला होता.

Vasai Virar Election
Vasai Virar Election
Vasai Virar Election 2026 : वसई विरार महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप झाला होता.ईव्हीएममध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दर्शनवणाऱ्या कागदावर काही विशिष्ट पक्षांची कमळ, धनुष्यबाण ही चिन्हे ठळकपणे दिसत होती तर इतर पक्षाची चिन्हे पुसट झाल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारांशी चर्चा करून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे.
advertisement
राज्य निवडणूक आयोगाच्या दि.०८ नोव्हेंबर २०२५ च्या अधिसुचनेनूसार वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांना देण्यात येणारे निवडणूकीचे चिन्हांची जाहीर प्रसिध्दी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी त्यांच्या आवडीचे चिन्ह उमेदवारी नमून्यामध्ये सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्ह वाटपाबाबत कार्यवाही केली व उमेदवारांना त्यांचे मतपत्रिकेवर छापावयाचे नाव व चिन्ह यांची माहिती देण्यात आली. पण चिन्ह वाटपांच्या वेळेत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही.
advertisement
त्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहिर झाल्यानंतर मतदानाच्या अनुषंगाने उमेदवारांची नावे व चिन्हे नमूद असलेले मतपत्रिका *सकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून मुद्रीत करुन आणण्यात आलेल्या आहेत. या शासकीय मुद्रणालयात इतर महापालिकांच्याही मतपत्रिका मुद्रीत करण्यात आलेल्या आहेत व त्यामुळे सदर बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही.
advertisement
तसेच याबाबत काही राजकीय पक्षांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ यांच्या कार्यालयात भेट देऊन संबधित पक्षांच्या उमेदवारांशी चर्चा करुन त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतपत्रिकेतील निवडणूक चिन्हांबाबत वस्तूस्थिती समजावून सांगितली व त्यांनी ती मान्यही केली.
advertisement
तसेच काही पक्षांचे पदाधिकारी काही कामानिमित्त आयुक्त यांचेकडे आले असता राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व चिन्ह त्यांना दाखवण्यात आले व त्यानुसारच शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून छपाई केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील अंतिम उमेदवारांच्या नावाबाबत व चिन्हांबाबत महानगरपालिका निवडणूक विभाग व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत मा.निवडणूक आयोगाच्या नियमानूसारच योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरच्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election 2026 : मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना वसई विरारमध्ये चिन्हावरून वाद, कमळ, धनुष्यबाणावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement