Girija Oak : 'मला माफ करा...' फडणवीसांची मुलाखत सुरू होताच असं का म्हणाली गिरिजा ओक?

Last Updated:
Girija Oak - Cm Devendra Fadnavis Interview : अभिनेत्री गिरिजा ओक हिनं पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत सुरू होण्याआधी ती मला माफ करा असं म्हणाली. मुख्यमंत्र्यांच्या समोर गिरिजा ओक असं का म्हणाली?
1/7
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाकडून ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन मांडण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट पुणेकरांशी संवाद साधला. पुण्यातील एरंडवणे परिसरातील शुभारंभ लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला.

advertisement
2/7
या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे सध्या सर्वत्र चर्चेत असलेली नॅशनल क्रश गिरिजा ओक. गिरिजा ओकने या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट मुलाखत घेतली. मात्र मुलाखत सुरू होण्याआधीच गिरिजानं  सगळ्यांची माफी मागितली. गिरिजा असं का म्हणाली?

3/7
मुलाखतीच्या सुरुवातीलाच गिरिजा ओकने उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून म्हटलं,
मुलाखतीच्या सुरुवातीलाच गिरिजा ओकने उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून म्हटलं, "नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंचावर मान्यवर नसून प्रेक्षकांमध्ये आहेत. सगळ्या प्रेक्षकांमधील मान्यवरांचं स्वागत. देवेंद्रजी, आपलंही मनापासून पुण्यात स्वागत."
advertisement
4/7
यानंतर गिरिजा ओक म्हणाली,
यानंतर गिरिजा ओक म्हणाली, "पुणेकरांच्या वतीने मला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. खरंतर मला जरा धडकीच भरली आहे. कारण मी पुण्याची नसून पुण्याची सून आहे."
advertisement
5/7
गिरिजा ओक पुढे म्हणाली,
गिरिजा ओक पुढे म्हणाली, "सगळी सासरची मंडळी समोर जज करायला बसली आहेत असं मला वाटतंय. काही चूक-भूल झाली तर आताच, आधीच मी माफी मागते."
advertisement
6/7
‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात शहरातील विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, शिक्षण आणि भविष्यातील पुण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, गिरिजा ओकची सहज, मनमोकळी आणि प्रेक्षकांशी जोडणारी शैली या मुलाखतीचं खास आकर्षण ठरली.

7/7
नॅशनल क्रश अभिनेत्री गिरिजा ओकआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती.  'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. 

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement