राज ठाकरेंचा अदानींवर हल्लाबोल, तो व्हिडीओ पाहून शिवाजी पार्कवर सन्नाटा, उद्धव ठाकरेंकडून भावाच्या भाषणाचं कौतुक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज ठाकरे यांच्या भाषणाने आणि भाषणादरम्यानच्या सादरीकरणाने संपूर्ण शिवाजी पार्क स्तब्ध झाले होते. त्यांच्या याच भाषणाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.
मुंबई : सरकार पुरस्कृत उद्योजकाला पुढे करुन महाराष्ट्रद्वेषी लोकांकडून एमएमआर परिसर बळकवायचा डाव आखला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने लढत मराठी माणसांनी ज्या पद्धतीने मिळवली त्याचा राग अजून काही गुजराती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. त्या रागातूनच अदानी समुहाला हाताशी धरून एमएमआर परिसर कसा अदानींच्या ताब्यात जात आहे हे सांगणारी चित्रफीत दाखवून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी माणसांचे मने पेटवली. त्यांच्या भाषणाने आणि भाषणादरम्यानच्या सादरीकरणाने संपूर्ण शिवाजी पार्क स्तब्ध झाले होते. त्यांच्या याच भाषणाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.
राज ठाकरे यांनी पोटतिडकीने मांडणी केली. पण ही चित्रफित पाहून मराठी माणसांच्या डोक्यात तिडीक गेली नाही तर आपल्याला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या सादरीकरणाने आपल्यासोबत काय होतेय, हे मराठी माणसाला कळून चुकले असेल. त्यामुळे मुंबई आपल्या हातून जाऊ द्यायची नसेल तर येत्या १५ तारखेला इंजिन-मशाल आणि तुतारीचे बटन दाबा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
advertisement
जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर...
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत राज ठाकरे यांनी दाखवली. ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की, असे राज ठाकरे म्हणाले.
advertisement
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूह देशभरात कसा पसरत चालला आहे आणि एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे हे समजून घ्यावंच लागेल. याची ही चित्रफीत.... जरूर पहा...
भारतात अदानी २०१४ - २०२५#मुंबई #महाराष्ट्र #BMC pic.twitter.com/Tz3hdsvlm3
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 11, 2026
advertisement
चित्रफितीत काय आहे?
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूह देशभरात कसा पसरत चालला आहे आणि एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे हे समजून घ्यावंच लागेल. याची चित्रफितीत राज ठाकरे यांनी सभेत दाखवली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरेंचा अदानींवर हल्लाबोल, तो व्हिडीओ पाहून शिवाजी पार्कवर सन्नाटा, उद्धव ठाकरेंकडून भावाच्या भाषणाचं कौतुक









